सलग 3 सामने गमावले; अजूनही मुंबई इंडियन्स प्लेऑफ गाठू शकते का?

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

Updated: Sep 28, 2021, 12:18 PM IST
सलग 3 सामने गमावले; अजूनही मुंबई इंडियन्स प्लेऑफ गाठू शकते का? title=

मुंबई : आयपीएलमधील सर्वात आवडती आणि यशस्वी टीम म्हणजे रोहित शर्माची मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. मात्र यंदाच्या 14व्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी म्हणावी तशी चांगली झालेली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स जेतेपदाची हॅट्रिक मारणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

गेल्या तीन मॅच मुंबईला पराभवाची चव चाखावी लागली आहे. त्यामुळे आता फॅन्सच्या मनात मुंबई इंडियन्स प्ले ऑफ तरी गाठणार का असा प्रश्न आहे. गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूने मुंबईचा पराभव केल्यामुळे मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटून दुसऱ्या म्हणजेच सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईने 10 सामन्यात 4 विजय आणि 6 पराभवासह 8 पॉईंट्स झाले आहेत. यासोबत त्यांचं नेट रनरेट -0.551 आहे.

मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये पोहोचणार का?

मुंबईचे अजून 4 सामने बाकी आहेत. जर हे चारही सामने मुंबईने जिंकले तर त्यांचे 16 पॉईंट्स होतील. आणि जर असं झालं तर मुंबईची प्ले ऑफमधील जागा पक्की होईल.

सध्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन टीम्सने प्लेऑफमधील जागा जवळपास पक्की केली आहे. या दोन्ही संघांचे पॉईंट्स प्रत्येकी 16-16 इतके आहेत. 

मुंबई इंडियन्सचे पुढचे चार सामने हे पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यासोबत आहेत. हे चारही सामने मुंबईला जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुंबईसाठी प्रत्येक सामना हा आता 'करो या मरो' या परिस्थितीचा असणार आहे.