दुबई : केन विलियम्सन आणि सनरायझर्स हैदराबादच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. सनरायझर्स हैदराबाद टीमसाठी अजूनही प्ले ऑफचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर हैदराबादने विजय मिळवला. यानंतर त्यांच्या प्ले-ऑफमध्ये जाणाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
जेव्हा सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्ज विरुद्धचा शेवटचा सामना अवघ्या 5 धावांनी गमावला. त्यानंतर असं वाटलं होतं की, 'ऑरेंज आर्मी'च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. पण राजस्थान विरुद्धच्या विजयामुळे सनरायझर्स पुन्हा प्ले ऑफ 4च्या शर्यतीत सामील झाली आहे.
सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत आयपीएल 2021 मध्ये 10 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत. फक्त दोन सामने जिंकल्यानंतर केन विलियम्सनची टीम आयपीएल 2021च्या पॉईंट्स टेबलमध्ये 4 पॉईंट्ससह शेवटच्या क्रमांकावर आहे.
जर सनरायझर्स हैदराबादला आयपीएल 2021 च्या प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल, तर त्यांना उर्वरित चार सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. यामुळे त्याचे 12 गुण होतील. जेव्हा उर्वरित संघांमध्ये 12 गुणांसह संघर्ष असेल, तेव्हा SRH चांगल्या रन रेटच्या आधारावर प्ले ऑफ 4मध्ये स्थान मिळवू शकतं.
सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळणाऱ्या टीम्सची कामगिरी खराब राहिली पाहिजे. SRH चे चाहत्यांची एक इच्छा असेल ती म्हणजे, चेन्नई (CSK), दिल्ली (DC) आणि बेंगळुरू (RCB) या उर्वरित टीम्सविरुद्ध त्यांचे सर्व सामने जिंकावे. जेणेकरून तळाच्या 5 संघांचे गुण 12 च्या पुढे जाऊ शकणार नाहीत.