दाम्बुला : सलामीवीर शिखर धवनचे नाबाद शतक आणि कर्णधार विराट कोहलीचे नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत विजय मिळवला. पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतलीये.
या सामन्यादरम्यान मैदानावर असे काही घडले की ज्यामुळे विराटलाही आपले हसू आवरता आले नाही. श्रीलंकेने २१७ धावांचे विजयासाठी दिलेले आव्हान घेऊन भारताचे सलामीवीर मैदानात उतरले.
— cricket (@84107010ghwj) August 20, 2017
पाचव्या षटकात श्रीलंकेचा लसिथ मलिंगा गोलंदाजी करत असताना मैदानावर हास्यास्पद किस्सा घडला. या षटकातील पहिल्या चेंडूवर रोहितने फटका मारला. यावेळी मिडऑनवर उभ्या असलेल्या फिल्डरच्या हातून चेंडू निसटला. यावेळी धवनची नजर केवळ चेंडूवर होती.
रोहित चोरटी धाव घेण्याच्या विचारात होता तर दुसरीकडे धवनचे लक्ष चेंडूवर होते. त्यामुळे धाव घेण्याबाबत दोघेही संभ्रमात पडले. दोघांनीही कशीबशी एक धाव घेतली. मैदानावरील ही स्थिती पाहून पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या विराटलाही आपले हसू आवरता आले नाही.