CCL 2023 Schedule: सेलिब्रिटी क्रिकेट लीगला धमाकेदार सुरूवात, जाणून घ्या वेळ, तारीख, ठिकाण आणि सर्वकाही!

CCL 2023  Schedule: सुनील शेट्टी, किच्चा सुदीप, रितेश देशमुख, बॉबी देओल, आर्या आणि अखिल अक्किनेनी यांसारखी भारतीय सिनेसृष्टीतील काही प्रमुख नावं सामने खेळताना दिसणार आहेत.

Updated: Feb 20, 2023, 07:46 PM IST
CCL 2023 Schedule: सेलिब्रिटी क्रिकेट लीगला धमाकेदार सुरूवात, जाणून घ्या वेळ, तारीख, ठिकाण आणि सर्वकाही! title=

Celebrity Cricket League 2023: आजपासून सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या (CCL 2023) सामन्यांना सुरूवात होत आहे. त्यामुळे आता बॉलिवूडसह (Bollywood) क्रिडाविश्वात देखील आनंदाचं वातावरण आहे. या सामन्यांमध्ये बॉलिवूडचा सलमान खानपासून (Salman Khan) महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) देखील दिसणार आहे. सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2023 (Celebrity Cricket League 2023) मध्ये 19 सामने खेळवले जातील. जाणून घ्या सर्वकाही...

सुनील शेट्टी, किच्चा सुदीप, रितेश देशमुख, बॉबी देओल, आर्या आणि अखिल अक्किनेनी यांसारखी भारतीय सिनेसृष्टीतील काही प्रमुख नावं सामने खेळताना दिसणार आहेत.

CCL 2023 चे आठ संघ - 

मुंबई हिरोज, कर्नाटक बुलडोझर, चेन्नई रायनोज, तेलुगू वॉरियर्स, केरळ स्ट्रायकर्स, बंगाल टायगर्स, पंजाब दे शेर आणि भोजपुरी दबंग हे आठ संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.

सामने कुठे खेळवले जातील? 

जयपूर, हैदराबाद, रायपूर, जोधपूर, बेंगळुरू आणि तिरुवनंतपुरम या प्रमुख शहरांमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या (Celebrity Cricket League 2023) सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय.

सामने कुठे पहायला मिळतील?

अनेक चॅनेल्सवर हा सामना पहायला मिळेल. झी अनमोल सिनेमा हिंदी, झी अनमोल सिनेमा पिक्चर्स इंग्लिश, झी थिराई तमिळ, झी सिनेमालु तेलुगू, झी पिक्चर्स कन्नड, प्लावर्स टीव्ही मल्याळम, पीटीसी पंजाबी, झी बांगला सिनेमा आणि झी भोजपुरी या सर्व चॅनेल्सवर (CCL 2023  Live Streaming) विविध भाषेत सामना पहायला मिळेल.