महिनाभर काम करुन मिळायचे 6 हजार, उभारली 44 हजार कोटींची कंपनी; फॅक्टरी वर्करच्या मुलाचं 'असं' बदललं आयुष्य

Jaynti Kanani Success Story: जयंती यांना कधीकाळी महिन्याकाठी 6 हजार रुपये इतका पगार मिळायचा. पदोपदी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

Pravin Dabholkar | Updated: Jul 27, 2024, 02:27 PM IST
महिनाभर काम करुन मिळायचे 6 हजार, उभारली 44 हजार कोटींची कंपनी; फॅक्टरी वर्करच्या मुलाचं 'असं' बदललं आयुष्य title=
Jaynti Kanani

Jaynti Kanani Success Story: कठोर मेहनत, योग्य करिअरची निवड आणि आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा तुमचं नशिब बदलू शकतं. करिअरच्या सुरुवातीला सर्वांनाच कमी पगार मिळतो. पण यातले काहीजण पुढे जाऊन हजार करोडोच्या कंपनीचे मालक होतात. जयंती कनानी हे त्याचेच एक उदाहरण आहे. पॉलिगोन या कंपनीचे मालक असलेल्य जयंती यांना कधीकाळी महिन्याकाठी 6 हजार रुपये इतका पगार मिळायचा. पदोपदी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. पण आज त्यांनी 44 हजार 488 रुपयांची कंपनी उभारली आहे. जयंत कनानी यांचा जन्म अहमदाबाद येथील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला.त्यांचे वडील एका डायमंड फॅक्टरीमध्ये वर्कर होते. जयंती यांचे शिक्षण त्यांना परवडणारे नव्हते. कसंतरी त्यांनी बीटेक पर्यंतच शिक्षण घेतलं. पण यासाठी जयंत यांच्याकडे नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. जयंती यांना महिना अखेर 6 हजार रुपये पगार मिळायचा. काम करताना त्यांना खूप त्रास व्हायचा. तू नोकरी करु नकोस,असा सल्ला जयंती यांना त्यांच्या वडिलांनी दिला. यानंतर जयंती यांनी ती नोकरी बदलली. पण येथून मिळणाऱ्या पैशातूनही जयंती यांचा व्यवहार भागणारा नव्हता.

लवकरच झालं लग्न 

एक्स्ट्रा कमाईसाठी जयंती घरी येऊन काही प्रोजेक्टवर काम करायचे. यामुळे त्यांचा रोजचा खर्च भागू लागला होता. पण त्यांच्या तब्येतीवर याचा परिणाम होऊ लागला होता. पुढच्या काही महिन्यातच त्यांनी लग्न केलं. लग्नासाठी त्यांना कर्ज घ्यावं लागलं. कमाई कमी असल्यानं डोक्यावर आणखी कर्ज वाढलं आणि अडचणीदेखील वाढत गेल्या. त्यांनी पुन्हा काही नोकरी बदलल्या. दरम्यान उद्योजक बनण्याची इच्छा त्यांच्या मनात आली. 

अशी झाली सुरुवात 

जयंती कनानी हे एका कंपनीत डेटा एनालिस्ट म्हणून काम करत होते. तेव्हा त्यांची ओळख संदीप नेलवाल आणि अनुराग अर्जुन यांच्यासोबत झाली. संदीप हे सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. त्यांनी डेलॉइट आणि वेल्सपन सारख्या कंपनीत काम केलंय. अर्जुन यांनी सुरुवातीला जीएसटी संदर्भातील स्टार्टअप सुरु केला होता. पण तो काही चालला नव्हता. पैसा कमावण्यासाठी काहीतरी मोठं करावं असं तिघांनाही वाटत होतं. यामुळे तिघांनी मिळून 2017 साली पॉलीगॉन कंपनीची स्थापना केली.सुरुवातीला याचे नाव मेटिक असे ठेवण्यात आले. 

7 वर्षांनी मिळाले यश 

पॉलीगॉन कंपनीला स्थिर होण्यास 7 वर्षांचा कालावधी लागला. कंपनीचे सध्याचे भांडवर 44 हजार 488 हजार कोटी रुपये इतके आहे. पॉलीगॉनला अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शार्क टॅंक जज मार्क क्यूबनकडून फंडींग मिळाले. याशिवाय कंपनीत सॉफ्टबॅंक, टायगर ग्लोबल आणि सिकोइया कॅपिटल यांनी पैसे लावले. 

काय करते कंपनी?

पॉलीगॉन प्लॅटफॉर्मच्या मदतीने सहजपणे इथेरियम स्केलिंग आणि इन्फ्रा डेव्हलपमेंटचे काम करता येते. यूजर्स याच्या मदतीने अॅपदेखील तयार करु शकतात.  ब्लॉकचैनचा गेमिंग प्लेयर्स, नॉन फंजिबल टोकस आणि डिसेट्रलाइज्ड फायनान्समध्ये पॉलीगनचा वापर वेगाने वाढू लागला आहे.