क्रिस गेलची रासलिला, महिलांसोबतचा डान्स व्हायरल

वेस्ट इंडिजचा आक्रमक खेळाडू क्रिस गेल हा त्याच्या मैदानातल्या खेळींबरोबरच मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळेही चर्चेत असतो. 

Updated: Jan 9, 2020, 01:31 PM IST
क्रिस गेलची रासलिला, महिलांसोबतचा डान्स व्हायरल

मुंबई : वेस्ट इंडिजचा आक्रमक खेळाडू क्रिस गेल हा त्याच्या मैदानातल्या खेळींबरोबरच मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळेही चर्चेत असतो. यावेळी क्रिस गेलने त्याच्या मैदानाबाहेरच्या रासलिला दाखवल्या आहेत. डान्स फ्लोअरवर नाचतानाचा क्रिस गेलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. क्रिस गेल या व्हिडिओत पबमध्ये थिरकतना दिसत आहे.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ क्रिस गेलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. हा व्हिडिओ नेमका कोणता आहे, हे समजू शकलेलं नाही. इन्स्टाग्रामवरुन लॉग आऊट करत आहे, आता मला टिकटॉकवर पाहा. तिकडेही युनिव्हर्स बॉस चमकेल, असं कॅप्शन गेलने या व्हिडिओ पोस्टला दिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#iAmTheMovie - Imma logout from instagram on this note!! Catch me on #tiktok where the #UniverseBoss will #rock #iThankYouBye #iToldYouImTheGreatestOfAllTime #40ShadesOfGayle #KingOF2020 #IMLit

A post shared by KingGayle (@chrisgayle333) on

क्रिस गेल हा सध्या बांगलादेशमध्ये बांगलादेश प्रिमियर लीगमध्ये खेळत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तिकडाचाच असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. गेल हा सध्या बांगलादेश प्रिमियर लीगमध्ये चट्टोग्राम चॅलेंजर्स या टीमकडून खेळत आहे. यंदाच्या मोसमात गेलने एकच मॅच खेळली आहे. ७ जानेवारीला राजशाही रॉयल्सविरुद्धच्या मॅचमध्ये गेलने १० बॉलमध्ये २३ रनची खेळी केली, यामध्ये ३ सिक्सचा समावेश होता. गेलच्या टीमने ही मॅच ७ विकेटने जिंकली.