लिनने खलीलच्या बॉलवर ठोकले 3 सिक्स, प्रेक्षकाने पकडला कॅच

भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यांत आज पहिली टी-20 

Updated: Nov 21, 2018, 03:05 PM IST
लिनने खलीलच्या बॉलवर ठोकले 3 सिक्स, प्रेक्षकाने पकडला कॅच

मुंबई :  भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यांत आज पहिली टी-20 रंगत आहे. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडिअममध्ये हा सामना सुरु आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकत आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाची सुरुवात इतकी चांगली झाली नाही. खलील अहमदने भारताला पहिला विकेट मिळवून दिला.

पण या सामन्यात क्रिस लिन खूप आक्रमक दिसला. सातव्या ओव्हरमध्ये क्रिस लिनने खलील अहमदच्या बॉलवर 3 सिक्स मारले. क्रिस लिनने मारलेल्या सिक्सवर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका चाहत्याने बॉल कॅच केला. लिनने एकाच ओव्हरमध्ये 3 सिक्स मारले.

भारताविरुद्ध आक्रमक समजल्या जाणाऱ्या क्रिस लिनला लवकरच कुलदीप यादवने माघारी धाडलं. क्रिस लिनने 20 बॉलमध्ये 37 रन केले. त्याने या इनिंगमध्ये 4 सिक्स आणि 1 फोर मारला.