बेघर झाल्याने चेन्नईच्या खेळाडूंनी व्यक्त केले दु:ख

टी-२० स्पर्धेत चेन्नईचे उरलेले सामने घरच्या मैदानावर न होता पुण्यात शिफ्ट करण्यात आलेत. आपल्या घरापासून दूर गेल्याने चेन्नईच्या खेळाडूंनी सोशल मीडियावरुन आपली निराशा जाहीर केलीये. 

Updated: Apr 13, 2018, 09:23 AM IST
बेघर झाल्याने चेन्नईच्या खेळाडूंनी व्यक्त केले दु:ख title=

मुंबई : टी-२० स्पर्धेत चेन्नईचे उरलेले सामने घरच्या मैदानावर न होता पुण्यात शिफ्ट करण्यात आलेत. आपल्या घरापासून दूर गेल्याने चेन्नईच्या खेळाडूंनी सोशल मीडियावरुन आपली निराशा जाहीर केलीये. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर आणि या सीझनमध्ये चेन्नईकडून खेळणारा शेन वॉटसन ट्विटरवर लिहितो, आमचा संघ आणि चेन्नईच्या फॅन्ससाठी हे दु:खद आहे की या सीझनमध्ये आम्ही घरच्या मैदानावर सामने खेळू शकणार नाही. गेल्या सामन्यातील माहोल चांगला होता. तामिळनाडूमधील परिस्थिती लवकरच सुधारेल अशी आशा आहे. 

भारताचा क्रिकेटर सुरेश रैना म्हणतो, या सीझनमध्ये घरच्या मैदानावर न खेळणे तसेच चेन्नईच्या चाहत्यांचे मनोरंजन करता येणार नसल्याने खूप दु:ख होतेय. तुम्ही नेहमीच्या आमच्या हृदयात राहणार आहात. 

भारतीय बल्लेाज सुरेश रैना ने कहा , ‘‘ हमें इस सत्र में अपने घरेलू मैदान पर ना खेलने और चेन्नई के दर्शकों का मनोरंजन नहीं कर पाने की कमी खलेगी. आप हमेशा हमारे दिलों में रहेंगे. ’’

तामिळनाडू राज्य प्रशासनाने सुरु असलेल्या कावेरी वादप्रकरणामुळे या स्पर्धेला पर्याप्त सुरक्षा व्यवस्था देण्यास असमर्थता दर्शवली. यामुळे बीसीसीआयला सामन्यांचे स्थान बदलावे लागले. 

यावर बोलताना हरभजन म्हणाला, ही उदास करणारी बातमी आहे. चेन्नई एकही सामना होणार नाही. चेन्नईच्या फॅन्सनी दोन वर्षे वाट पाहिली होती. आशा आहे की लवकरच यावर तोडगा निघेल आणि चेन्नईत सामने होतील.