CWG 2022 : महिलांच्या बॉक्सिंगमध्ये 50 किलो वजनी गटामध्ये भारताच्या निखत झरीनने आयर्लंडच्या कार्ली एमसी नॉलचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. बर्मिंगहॅममध्ये सुरु असेलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचे आजचे हे चौथे सुवर्णपदक आहे. तर भारताने एकूण 17 सुवर्णपदके जिंकत पदकतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकून चौथे स्थान मिळवले आहे.
याआधी निखत झरीनने भारतासाठी आणखी 1 पदक निश्चित केले होते. निखत जरीनने महिलांच्या 48-50 किलो वजनी गटातील बॉक्सिंगचा उपांत्य सामना जिंकला होता. तिने इंग्लंडच्या सावनाचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे निखतकडून पदक निश्चित मानले जात होते. मात्र तिने उत्तम खेळ करत सुवर्णपदक जिंकले आहे.
याआधी बॉक्सिंगमध्ये अमित पंघलने पुरुषांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या केरेन मॅकडोनाल्डचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. तर नीतू घंगासने महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत यजमान इंग्लंडच्या बॉक्सर डेमी जेडचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
#CommonwealthGames2022 | India boxer Nikhat Zareen beats Mcnaul of Northern Ireland to win Gold in 48-50 Kg flyweight category pic.twitter.com/pgqNzKSwdk
— ANI (@ANI) August 7, 2022
दरम्यान, बर्मिंगहॅममध्ये भारताने आतापर्यंत 17 सुवर्ण, 12 रौप्य आणि 19 कांस्य पदकांसह 48 पदके जिंकली आहेत. यासह भारताने न्यूझीलंडला मागे टाकत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.