टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा होता दावेदार? पण T20 World Cup टीममधून ही केलं बाहेर

कोण होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार?

Updated: Oct 6, 2021, 08:59 PM IST
टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा होता दावेदार? पण T20 World Cup टीममधून ही केलं बाहेर title=

मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 या महिन्याच्या 17 तारखेपासून सुरू होत आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने गेल्या महिन्यातच भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघात भारताच्या 15 सर्वोत्तम खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तर तीन खेळाडूंना राखीव ठेवण्यात आले आहे. पण या संघात असे काही क्रिकेटपटू होते ज्यांची जागा निश्चित मानली जात होती पण निवडकर्त्यांनी त्यांना संधी दिली नाही.

मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला भारताच्या टी-20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले. अय्यर वर्ल्ड कपसाठी राखीव ठेवलेल्या तीन खेळाडूंपैकी एक आहे, पण त्याला मुख्य संघात स्थान देण्यात आलेले नाही. अय्यर बराच काळ संघाचा कायम क्रमांक 4 चा फलंदाज होता, परंतु जेव्हा इंग्लंड संघाने या वर्षाच्या सुरुवातीला भारताचा दौरा केला तेव्हा त्याला इतकी दुखापत झाली की तो बराच काळ संघाबाहेर होता. यानंतर, निवडकर्त्यांनी अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवला घेतले आणि त्याने आता सर्वोत्तम खेळ दाखवून आपली जागा पक्की केली आहे. मात्र, सध्याच्या आयपीएल हंगामात सूर्यकुमारचा फॉर्म खूपच खराब झाला आहे आणि आता त्याच्या जागी अय्यरला पुन्हा संघात आणण्याची चर्चा आहे.

आयपीएलमध्ये सातत्याने आपली टीम दिल्ली कॅपिटल्सला यशाकडे नेणाऱ्या श्रेयस अय्यरला एकेकाळी भारतीय संघाचा कर्णधार होण्याचा मोठा दावेदार मानले जात होते. खरं तर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर भारताकडे फक्त केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे कर्णधारपदाचे मोठे दावेदार होते. पण अय्यरला आता संघात आपले स्थान निर्माण करणे कठीण जात आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद त्याच्या जागी युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला देण्यात आले. गेल्या वर्षी अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने आयपीएल फायनलपर्यंत प्रवास केला होता. पण आता असे दिसते की अय्यरला पुन्हा दिल्लीचे कर्णधारपदही मिळणार नाही कारण पंतच्या नेतृत्वाखाली या संघाची कामगिरी आश्चर्यकारक राहिली आहे.

एका दुखापतीने सर्व काही उद्ध्वस्त

सूर्यकुमार संघात येण्यापूर्वी अय्यर सतत खेळत होता. पण इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत अय्यरला दुखापत झाली ज्यामुळे त्याला बरे होण्यास बराच वेळ लागला. सध्याची परिस्थिती पाहता असे दिसते की, खुद्द कर्णधार विराट कोहलीच अय्यरपेक्षा सूर्यकुमार यादववर जास्त विश्वास ठेवतो. यामागील एक मोठे कारण म्हणजे सूर्यकुमारने आयपीएलमध्ये भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. पण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील अय्यरची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे आणि आता तो लवकरच संघात परतू शकतो असा विश्वास आहे.