मुंबई : देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं चित्र आहे. मुंबईत गुरुवारी एका दिवसात 20 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याचा परिणाम भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयच्या मुख्यालयातही दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बीसीसीआय कार्यालयातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
एका अहवालानुसार, मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलंय. यानंतर तीन दिवस कार्यालय बंद ठेवण्यात आलंय. यानंतर अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सेल्फ क्वारंटाईन करण्यास सांगण्यात आलंय.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एमसीएचं कार्यालयही तीन दिवसांपासून बंद आहे. एमसीएच्या वतीने सचिव संजय नाईक यांनी एपेक्स काऊंसिलला कोरोना प्रकरणाची माहिती दिली आणि कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान यानंतर बीसीसीआयच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आले आहे, त्यापैकी एक क्रिकेट ऑपरेशन विभागातील आहे, तर उर्वरित दोन वित्तीय विभागातील आहेत.
कोरोनामुळे बीसीसीआयने भारतातील देशांतर्गत स्पर्धा रणजी ट्रॉफी पुढे ढकलली आहे.