मुंबई : शार्दूल ठाकूरने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत गोलंदाजीसोबत फलंदाजी करत चांगला खेळ केला. जोहान्सबर्गच्या टेस्टमध्ये शार्दूलने 7 विकेट्स काढत इतिहास रचला. इतकंच नव्हे तर 24 बॉल्समध्ये तुफान 28 रन्सची खेळी करत अनेकांची मनं जिंकली.
शार्दूलने खेळाच्या जोरावर टीम इंडियामध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. इंग्लंड तसंच ऑस्ट्रेलिया यांच्याविरूद्धही कठीण परिस्थितीत त्याने अर्धशतक झळकावलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज इमरान ताहिरने शार्दूलचा एक रोमांचकारी किस्सा सांगितला आहे.
इमरानने सांगितलं की, भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल फलंदाजीला खूप गांभीर्य देतो आणि नेटमध्ये त्याला पूर्ण वेळ नाही मिळाला तर रागही येतो. शार्दुल आणि ताहिर हे दोघंही चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये एकत्र खेळले आहेत.
स्टार स्पोर्ट्ससा दिलेल्या इंटरव्यूमध्ये इमरान ताहिरने शार्दूलचा एक किस्सा सांगितला. यामध्ये इमरान म्हणाला, "फलंदाजी करत असताना शार्दूल बारकाईने अभ्यास करतो. एक-दोन वेळा नेट्समध्ये जास्त वेळ फलंदाजी न मिळाल्यामुळे तो रागाच्या भरात लाल झाला होता."