Corona : 'त्या' बातम्या चुकीच्या; रोनाल्डोच्या हॉटेलचं स्पष्टीकरण

पाहा नेमकं काय झालं... 

Updated: Mar 16, 2020, 05:30 PM IST
Corona : 'त्या' बातम्या चुकीच्या; रोनाल्डोच्या हॉटेलचं स्पष्टीकरण  title=
ख्रिस्तियानो रोनाल्डो

मुंबई : Corona व्हायरसचा साऱ्या विश्वालाच विळखा बसत असताना दहशतीच्या या वातावरणात आता सर्वसामान्यांमधील काही देवदूत हिरीरिने पुढाकार घेत कोरोना बाधितांच्या मदतीसाठी धावत आहेत. याच व्यक्तींमध्ये फुटबॉलपटू christiano Ronaldo याच्या नावाचीही चर्चा होती. 

पोर्तुगाल या देशाच्या संघाकडून फुटबॉल खेळणाऱ्या या जागतिक ख्यातीच्या खेळाडूनने प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता एक मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलं गेलं होतं.. कोरोना व्हायरसच्या दहशतीमध्येच याचा संसर्ग होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतच आहेत. याच वातावरणात रुग्णांची वाढती संख्या पाहता रोनाल्डोने एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याची बाब अधोरेखित करत त्याने त्याच्या हॉटेल्सचं रुपांतर रुग्णालयात केल्याचं वृत्त सर्वांचीच शाबासकी मिळवून गेलं. 

चर्चांच्या या सत्रातच, सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर करत कोरोनाच्या दहशतीचं गांभीर्य सर्वांपुढे मांडलं. WHOकडून देण्यात आलेले सर्व इशारे पाळत प्रतिबंधात्मक उपाय अवलंबात आणण्यावर आपण सर्वांनीच भर दिला पाहिले असंही त्याने या पोस्टच्या माध्यमातून म्हटलं. कोणत्याही कामापेक्षा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यालाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असा सूर त्याने आळवला. 

पाहा, कोरोनाच्या दहशतीत इटलीमध्ये असा सुरु आहे जगण्याचा 'सुरेल' संघर्ष

आता मात्र रोनाल्डोच्या लिस्बन येथील हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने आपण या सर्व चर्चांपासून अनभिज्ञ असल्याचं म्हटलं. 'आम्ही हॉटेल व्यवसायात आहोत. आमचं रुपांतर रुग्णालयात होणार नाही. आम्ही हॉ़टेल व्यवसायातच होतो आहोत आणि यापुढेही राहू', असं म्हणत त्या कर्मचाऱ्याने आपल्याला माध्यमांचेही फोन आल्याचं सांगितल्याचं वृत्त goal.comने प्रसिद्ध केलं. 

 
 
 
 

 
 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

वाचा : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी 'हे' जरुर वाचा

सध्याच्या घडीला रोनाल्डोच्या हॉटेल्सचं रुग्णालयात रुपांतर होण्याविषयी आणि न होण्याविषयीच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरला आहे. तेव्हा आता या प्रकरणी खुद्द रोनाल्डो काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.