Ind vs Eng Test : राजकोट कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा... फिरकी गोलंदाज बाहेर

IND vs ENG Rajkot : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासन राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली असून फिरकी गोलंदाजाला बाहेर बसवण्यात आलं आहे.

Updated: Feb 14, 2024, 04:57 PM IST
Ind vs Eng Test : राजकोट कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा... फिरकी गोलंदाज बाहेर title=

India vs England Rajkot : भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. राजकोटच्या (Rajkot Test) सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअममध्ये हा सामना रंगणार असून भारतीय वेळेनुसार 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनची (England Playing Eleven) घोषणा केली आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज शोएब बशीरला (Shoeb Bashir) प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट संघाने अद्याप प्लेईंग इलेव्हनची घोषणा केलेली नाही.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अधिकृत वेबसाईटवर प्लेईंग इलेव्हनची माहिती दिली आहे. राजकोट कसोटी साममन्यात इंग्लंडने मार्क वुडला संधी दिली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा कसोटी कारकिर्दीतील हा 100 वा सामना असणार आहे. शोएब बशीरला बाहेर का बसवण्यात आलं याचं कारण मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेलं नाही. 

मार्क वुडची कारकिर्द
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडची क्रिकेट कारकिर्द शानदार आहे. त्याने 32 कसोटी सामन्यात 104 विकेट घेतल्या आहेत. यात त्याने 4 वेळा पाच किंवा त्याहून जास्त विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 735  धावा केल्यात. यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. इंग्लंडकडून वूड 66 एकदिवसीय सामने खेळला असून यात त्याने 77 विकेट घेतल्या आहेत. हैदराबाद कसोटीत मार्क वुडचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यानंतर विशाखापट्टणम कसोटी त्याला संधी देण्यात आली नाही. आता पुन्हा तिसऱ्या कसोटीत त्याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

बेन स्टोकचा शंभरावा कसोटी सामना
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्ससाठी राजकोट कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. स्टोक्सचा क्रिकेट कारकिर्दीतील हा शंभरावा कसोटी सामना आहे. शंभर कसोटी सामन्यांचा टप्पा गाठणारा बेन स्टोक्स हा इंग्लंडचा सोळावा खेळाडू असणार आहे. बेन स्टोक्सने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि अल्पावधीतच एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून आपली छाम उमटवली. कर्णधार म्हणूनही बेन स्टोक्सची कामगिरी दमदार आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने 20 पैकी 14 कसोटी सामने जिंकले आहेत. बेन स्टोक्सने 99 कसोटी सामन्यात 197 विकेट घेतल्या आहेत. राजकोट कसोटीत आणखी तीन विकेट घेतल्यास 100 व्या कसोटीत तो 200 विकेटचा टप्पा पूर्ण करेल.

इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स एंडरसन