चेन्नई फ्रँचायझीला मोठा धक्का; 13.25 कोटी बोली लावलेला क्रिकेटपटू खेळणार नाही, एका कॉलवर निर्णय

  Chennai Super Kings Team  T20 2023:  आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) बरोबरच आता चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings ) मोठा धक्का बसला आहे. 13.25  कोटी रुपयांची बोली लावलेला  क्रिकेटपटू  प्रीमियर T20 या लीगमध्ये खेळणार नाही. 

Updated: Dec 30, 2022, 10:40 AM IST
चेन्नई फ्रँचायझीला मोठा धक्का; 13.25  कोटी बोली लावलेला क्रिकेटपटू खेळणार नाही, एका कॉलवर निर्णय title=
Harry Brook (Credits: Twitter)

Chennai Super Kings Team :  प्रीमियर T20 (Premier T20) सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings ) मोठा धक्का बसला आहे. 13.25  कोटी रुपयांची बोली लावलेला  क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळणार नाही. त्याआधी मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा धक्का बसला होता. ऑस्ट्रेलियाचा धोकादायक ऑलराऊंडर (Australia player) कॅमरुन ग्रीन (Cameron Green) ला 17.5 कोटी रुपयांना IPL टीममध्ये घेतले होते. तो दुखापतीमुळे IPL 2023 या लीगमध्ये खेळणार नाही. आता  तसाच काहीसा प्रकार चेन्नई सुपर किंग्जबाबत घडला आहे. 13.25 कोटी रुपयांनी सर्वात मोठी बोली लावलेला  इंग्लंडचा खेळाडू हॅरी ब्रूक (Harry Brook) आता  प्रीमियर T20 ( Premier T20) खेळणार नाही. याबाबत  England and Wales Cricket Board ने (ECB) माहिती दिली आहे. (SA20: Harry Brook Withdrawn By ECB From The SA20 League)

हॅरी ब्रूक (Harry Brook)  हा प्रीमियर T20 लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) फ्रँचायझीने विकत घेतलेल्या जोहान्सबर्ग सुपर किंग्स संघाचा एक भाग होता आणि आता तो या लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. ECB च्या या निर्णयामुळे CSK ला मात्र मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) हा निर्णय चेन्नई सुपर किंग्जच्या सहमालकांना आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या आयोजकांना कळवला आहे. हॅरी ब्रूकच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करुन ECB ने हा निर्णय घेतला आहे.

हॅरी ब्रूक  (Harry Brook) याला आयपीएल ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. मात्र तो नव्या वर्षात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका प्रीमियर T20 लीगमध्ये खेळणार नाही. तो चेन्नईची फ्रँचाइजी असलेल्या जोहान्सबर्ग सुपरकिंग्जकडून खेळणार होता. मात्र, आता तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, साउथ आफ्रिका लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय हॅरी ब्रूक याचा नाही. तर त्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने लीगमध्ये खेळण्यास परवानगी द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे आता तो खेळणार नाही. 

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जोहान्सबर्ग सुपरकिंग्ज मॅनेजमेंटला बुधवारी कॉल करुन याबाबतची माहितीदिली आहे.  हॅरी ब्रूक याचे वर्कलोड मॅनेजमेंट करायचे आहे. त्यामुळे तो साउथ आफ्रिका T20 लीगमध्ये खेळणार नाही. सीईओ काशी विश्वनाथ यांनी स्पष्ट केलं की, ब्रूक तीनही फॉरमॅटमध्ये खेळतो. त्यामुळे T200 लीगमध्ये खेळण्यास परवानगी देणे एक धोकादायक आहे.  

IPL ऑक्शन मध्ये सनरायर्झने हॅरी ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते.  दक्षिण आफ्रिकेत होणारी SA20 लीग 10 जानेवारीपासून सुरु होणार असून अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे, ज्यामध्ये हॅरी ब्रूक याच्या नावाचाही समावेश केला जाऊ शकतो. हॅरी ब्रूक याने पाकिस्तानमध्ये चांगली बॅटिंग केली होती. त्याने सलग तीन कसोटी शकते ठोकलीत. या दौऱ्यात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून सामनावीर ठरला होता.