Haryana Vidhan Sabha Elections Result 2024 : हरियाणा राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून याचे निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. हरियाणा येथील तोशाम जागेची मतमोजणी सुरु असून येथे सध्या भाजपची उमेदवार श्रुती चौधरी ही काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यापेक्षा 8665 मतांनी आघाडीवर आहे. श्रुतीला आतापर्यंत 43338 मतं मिळाली आहेत. तोशाम हरियाणा निवडणुकीतील सर्वात चर्चित जागा असून येथे काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांचा प्रचार करण्यासाठी माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आला होता.
हरियाणा निवडणुकीत तोशाम जागेवरून राजकारणातील एका कुटुंबाचे दोन सदस्य वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढत आहे. तोशाम या जागेवर भाजपने माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांची नातं आणि किरण चौधरींची मुलगी श्रुती हिला तर तिकीट दिलं. तर काँग्रेसने बंसीलालचा नातू आणि श्रुती हिच्या काकांचा मुलगा अनिरुद्ध चौधरी यांना विधानसभेचं तिकीट दिलं. आतापर्यंत माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांची तोशाम जागेवरील पकड त्यांचा मुलगा किरण चौधरी यांनी मजबूत ठेवली होती. किरण हे तब्बल 5 वेळा या जागेवरून आमदार म्हणून निवडणून आले. परंतु आता अनिरुद्ध चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही लढत अतिशय चुरशीची झाली होती.
हेही वाचा : राजकारणाच्या आखाड्यात कुस्तीपटू विनेश फोगटचा विजय, भाजप उमेदवाराचा केला पराभव
हरियाणा विधानसभा निवडणुकीत तोशाम जागेवरून निवडणूक लढणारे काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने प्रचार केला होता. यावेळी वीरेंद्र सेहवागने म्हंटले होते की ' आशा करतो की तोशामची जनता अनिरुद्ध चौधरी यांना भरपूर मतं देऊन विजयी करतील.
हेही वाचा : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर बनणार 'बापमाणूस', व्हिडीओ शेअर करून फॅन्सना दिली गुडन्यूज
वीरेंद्र सेहवाग जेव्हा तोशाम येथे प्रचारासाठी आला होता तेव्हा त्याने म्हंटले होते की, 'मी माझं कर्तव्य निभावतोय. आमच्या इथे असं होतं की असतं की मोठा भाऊ कोणतंही काम करत असेल तेव्हा परिवारातील सर्वजण त्याला पाठिंबा देतात'. अनिरुद्धने म्हंटले की, 'साधारणपणे क्रिकेटर्स निवडणुकीत प्रचारासाठी येत नाहीत. पण वीरेंद्र सेहवाग नेहमी प्रचारासाठी येतो. मला कधी बोलायची गरज पडत नाही.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
(50 ov) 300/8
|
VS |
IND
306/6(49 ov)
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.