MS Dhoni Hardik Pandya Viral Video: भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग (Mahendra Singh Dhoni) धोणीकडे पाहिलं जातं. 2020 मध्ये धोणीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Internation Cricket) निवृत्ती घेतली. पण निवृत्ती घेतल्यानंतरही धोणी या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. आता धोणीचा नवा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला असून सोशल मीडियावर (Social Media) तो तुफान व्हायरल झाला आहे. ऐरवी शांत स्वभावाचा असणारा धोणी या व्हिडिओत चक्क नाचताना दिसत आहे. धोणीबरोबर भारतीय टीमचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानेही (Hardik Pandya) डान्स केला आहे.
धोणी-हार्दिकचा डान्स व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध रॅपर बादशाह ( Rapper Badshah) काल चष्मा हे गाणं गाताना दिसत आहे. या गाण्यावर महेंद्र सिंग धोणी आणि हार्दिक पांड्या नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ दुबईमधल्या एका बर्थ डे पार्टीचा (Birth Day Party) असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्टात कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि ईशान किशन (Ishan Kishan) हे देखली सहभागी असल्याचं दिसत आहे. धोणीचा डान्स करतानाचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या व्हिडिओवर हजारोंनी लाईक्स आणि कमेंट्स येतायत.
Ms Dhoni with Hardik Pandya are enjoying birthday party in Dubai ft. Badshah #MSDhoni #HardikPandya #Badshah pic.twitter.com/ak8oB8j5Xr
— MS Dhoni 7781 #TataIPL #ChennaiSuperKings (@msdhoni_7781) November 27, 2022
IPL 2023 ची तयारी
महेंद्रसिंग धोणीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरी आयपीएलमध्ये त्याचा करिश्मा कायम आहे. धोणीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरि किंग्सने आतापर्यंत चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. आता धोणी IPL 2023 च्या तयारीला लागला आहे. पण हंगामानंतर धोणी आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे.
Mahi & hardik seen dancing at a party with their close friends, last night in dubai #MSDhoni pic.twitter.com/PB5pGPSZsJ
— Chakri Dhoni (@ChakriDhoni17) November 27, 2022
टीम इंडियाच भावी कर्णधार
टी20 वर्ल्ड 2022 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या पराभावनंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्हा उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे अष्टपैलू हार्दिक पांड्याला टीम इंडियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्याचीही मागणी होत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची टी20 सीरिज 1-0 ने जिंकली आहे. या आधी आयरर्लंड दौऱ्यावरही त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली होती.