टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला एलिस पेरीसोबत जायचं होते डेटवर; पण तिने ठेवली अशी अट...

Ellyse Perry : महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात सुंदर खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीचं नाव घेतलं जातं. तिच्या खेळाबरोबरच तिच्या सौंदर्याचेही लाखो चाहते आहेत. यात भारतीय क्रिकेट संघाच्याही एका खेळाडूचा समावेश आहे.

राजीव कासले | Updated: Aug 9, 2024, 09:13 PM IST
टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला एलिस पेरीसोबत जायचं होते डेटवर;  पण तिने ठेवली अशी अट... title=

Murali Vijay and Ellyse Perry : ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरी (Ellyse Perry) हिची उत्तम ऑलराऊंडर म्हणून गणना केली जाते. याशिवाय एक सुंदर खेळाडू म्हणून देखील एलिस पेरीचं नाव घेण्यात येतं. तिच्या खेळासोबत तिचा फिटनेस देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूचे भारतातही अनेक चाहते आहे. इतकंच नाही तर टीम इंडियाचा (Team India) एक खेळाडू देखील तिच्या प्रेमात असल्याची चर्चा होती. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिस पेरीचा घटस्फोट झाला आहे. 2020 मध्ये तिने तिचा पती तूमुआशी घटस्फोट घेतला. त्यांचं नाते 5 वर्षे टिकलं आणि नंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

टीम इंडियाचा हा खेळाडू होता पेरीचा चाहता
एलिस पेरीने 2007 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पेरी अजूनही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते. टीम इंडियाचा क्रिकेटर मुरली विजयला एलिस पेरीसोबत डिनर डेटवर जायचं होतं. भारताचा सलामीवर मुरली विजयने (Murali Vijay) 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लाइव्ह चॅटमध्ये त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली.

डेटवर जाण्याचा बनला होता प्लॅन
यादरम्यान मुरली विजयला विचारण्यात आलं की, कोणते दोन क्रिकेटपटू आहेत ज्यांच्यासोबत त्याला डिनर डेटवर जायला आवडेल. यानंतर मुरली विजयने पहिलं नाव शिखर धवन आणि दुसरे नाव ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर एलिस पेरीचं घेतलं होतं. मुरली विजय म्हणाला, त्याला एलिस पेरीसोबत डिनर डेटवर जायचे आहे. ती खूप सुंदर आहे.

एलिस पॅरीने डिनरला जाण्यासाठी एक गमतीशीर अट ठेवली आणि फक्त मुरली विजयच त्यासाठी पैसे देईल असं सांगितले. एलिस पॅरीने मुरली विजयच्या या वक्तव्यावर मजेशीर उत्तर दिलं आणि ती म्हणाली, 'मी अशी आशा करते की, या डेटचं बिल तो भरेल. तो अतिशय दयाळू मनाचा आहे.' 

कसा आहे एलिस पेरीचा क्रिकेट रेकॉर्ड
एलिस पेरीचा क्रिकेटमध्ये खूप चांगला रेकॉर्ड आहे. पेरीने ऑस्ट्रेलियासाठी 13 टेस्ट, 147 वनडे आणि 154 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एलिसा पेरीने टेस्टमध्ये 928 रन्स, वनडे सामन्यात 3958 रन्स आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1878 रन्स केले आहेत. याशिवाय पेरीने गोलंदाजीतही उत्तम कामगिरी केली असून पेरीने टेस्टमध्ये 39, वनडे सामन्यात 165 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 126 विकेट्स घेतल्या आहेत.