एकच ह्रदय आहे किती वेळा जिंकशील! सपोर्ट स्टाफसाठी रोहित शर्माचा मोठा निर्णय

Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कप जिंकत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला. विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांची बरसात झाली. बीसीसीआयने मुक्त हस्ताने टीम इंडियासाठी तिजोरी उघडली आणि खेळाडूंवर कोट्यवधींची उधळण केली.

राजीव कासले | Updated: Jul 11, 2024, 10:49 PM IST
एकच ह्रदय आहे किती वेळा जिंकशील! सपोर्ट स्टाफसाठी रोहित शर्माचा मोठा निर्णय title=

Rohit Sharma : तब्बल 17 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियावर कोट्यवधीं रुपयांची बरसात होतेय. आयसीसीकडून (ICC) विजेत्या संघाला 20 कोटींचं बक्षीस देण्यात आलं. तर बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियासाठी चक्क 125 कोटी रुपयांची घोषणा केली. हे पैसे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक आणि सिलेक्टर्स अशा 42 लोकांमध्ये वाटले गेले. यात सर्वात मोठा वाटा होता तो टी20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या 15 खेळाडूंचा. पण प्राईज मनी वाटपात रोहित शर्माने (Rohit Sharma) एक असा निर्णय घेतला ज्याने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकलीत. 

रोहित शर्माचा मोठा निर्णय
मीडिया रिपोर्टनुसार बीसीसीआयने जाहीर केलेल्या 125 कोटी रुपायांचं वाटप होत असताना रोहित शर्माने संघाच्या सपोर्ट स्टाफसाठी स्वत:चा बोनस सोडण्याचा निर्णय घेतला. सपोर्ट स्टाफलाही चांगला पैसा मिळावा यासाठी त्याने हा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या 15 खेळाडूंना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं. तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना 2.5 कोटी रुपये देण्यात आले. याशिवाय राखीव खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात आले. पण यात सपोर्ट स्टाफला कमी पैसे मिळाल्याचं रोहित शर्माच्या लक्षात आलं. 

या विरोधात रोहित शर्माने आवाज उठवला. टीम इंडियाच्या विजयात सपोर्ट स्टाफचाही तितकाच मोलाचा वाटा आहे, त्यांना कमी पैसे मिळता कामा नयेत, यासाठी आपण आपला बोनस सोडण्यास तयार असल्याचं रोहित शर्माने म्हटलं. रोहितच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय.

42 खेळाडूंमध्ये वाटप
मिळालेल्या माहितीनसुटी टीम इंडियातल्या 15 खेळाडूंना प्रत्येकी पाच कोटी रुपये मिळाले. याशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रवडि, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यंना प्रत्येकी 2.5 कोटी रुपये प्राईज मनी देण्यात आलं. राहुल द्रविड यांना पाच कोटी रुपये देण्यात येणार होते, पण आपल्या इतर कोचिंग स्टाफ इतकेच पैसे आपल्याला देण्यात यावेत अशी विनंती त्यांनी बीसीसीआयकडे केली होती. 

याशिवाय भारतीय संघाचे तीन फिजिओ, तीन थ्रो डाऊन स्पेशलिस्ट, दोन मसाज थेरेपिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच यांनाही प्रत्येकी 2 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं. तर पाच सदस्यीय निवड समितीला प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात आले. या स्पर्धेसाठी चार राखीव खेळाडूंची निवड होणार होती. त्यांनाही प्रत्येकी 1 कोटी रुपये बक्षीस मिळालं. व्हिडिओ अॅनालिस्ट, बीसीसीआयचे इतर स्टाफ मेंबर्सनाही प्राईज मनीचा हिस्सा मिळणार आहे.