Kedar Jadhav Father : बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर केदार जाधवचे वडील सापडले

Kedar Jadhav Father : सोमवारी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आणि अनेकांनाच धक्का बसला. ज्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार या खेळाडूचे वडील सापडले आहेत

Updated: Mar 28, 2023, 07:30 AM IST
Kedar Jadhav Father : बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर केदार जाधवचे वडील सापडले
cricketer Kedar Jadhav father found post missing for hours latest Marathi news

Kedar Jadhav Father : (Team India) भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधवचे वडील सोमवारी सकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. पुण्याच्या कोथरुथ येथून ते सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारात बेपत्ता झाले होते. केदारचे वडील, महादेव जाधव रिक्षानं गेले पण, त्यानंतर मात्र त्यांच्याकडे असणाऱ्या फोनवरही संपर्क साधता येत नव्हता. ज्यामुळं अखेर जाधव कुटुंबीयांनी पोलीस तक्रार दाखल केली. (cricketer Kedar Jadhav father found post missing for hours latest Marathi news )

पोलिसांना याबाबतची तक्रार मिळताच लगेचच तपास यंत्रणांनी कारवाई हाती घेत केदारच्या वडिलांचा शोध घेतला. सोमवारी दिवसभर कोथरुड शहरातील पाच पोलीस पथकांकडून महादेव जाधव यांचा शोध घेण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. ज्यानंतर महादेव जाधव अखेर मुंढवा पोलीस स्टेशन जवळ सापडले. 

हेसुद्धा वाचा : Yuvraj Singh On Suryakumar Yadav :"अपना सूर्या फिर चमकेगा…", खचलेल्या 'सूर्या'च्या बचावासाठी सिक्सर सिंग मैदानात!

 

cricketer Kedar Jadhav father found post missing for hours latest Marathi news

केदारनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली होती. या स्टोरीमध्ये दिलेल्या माहितीनुसार फिरायला गेलं असता स्मृतीभ्रंशामुळं ते हरवल्याचंही त्यानं या माध्यमातून सांगितलं. ज्यानंतर अलंकार पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या नेतृत्त्वाखाली तातडीनं तपास हाती घेण्यात आला होता. 

केदार आणि त्याची क्रिकेट कारकिर्द 

2014 मध्ये श्रीलंकेविरोधातील सामन्यातून केदारनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 42.09 च्या सरासरीनं 1389 धावा केल्या. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 101.60 इतका होता. एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीत त्यानं 2 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली. इतकंच नव्हे तर, गोलंदाजीच्या बळावर त्यानं 27 गडीही बाद केले. असं असलं तरीही सध्या मात्र केदारच्या कारकिर्दीत फारसे चांगले दिवस सुरु नाहीयेत. यंदाच्या आयपीएल लिलावादरम्यान केदारला कोणत्याही संघानं निवडलेलं नाही, थोडक्यात तो 'अनसोल्ड' राहिला आहे. त्यामुळं काही क्रिकेटप्रेमींची निराशा झाल्याचं पाहायला मिळालं.