विराट आणि सचिनला या भारतीय खेळाडूनं टाकलं मागे

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली प्रत्येक सामन्यात जरी काहीना काही रेकॉर्ड बनवत असला तरी त्याचा रेकॉर्ड मात्र एका खेळाडूने मोडला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 28, 2018, 02:49 PM IST
विराट आणि सचिनला या भारतीय खेळाडूनं टाकलं मागे title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली प्रत्येक सामन्यात जरी काहीना काही रेकॉर्ड बनवत असला तरी त्याचा रेकॉर्ड मात्र एका खेळाडूने मोडला आहे.

विराटचा मोडला रेकॉर्ड

मयंक अग्रवालने भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये एका सीजनमध्ये 2000 किंवा त्याच्यापेक्षा अधिक रन बनवण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. यामध्ये ८ शतकं आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. मयंकने या सीजनमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये 5 शानदार शतकांच्या मदतीने 105.45 च्या रनरेटने 1160 रन बनवले आहेत. 

सय्यद मुश्ताक अली (टी20 टूर्नामेंट) मध्ये त्याच्या नावावर 258 रन आहेत. त्याने 145 च्या रनरेटने हे रन केले आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 100 च्या रनरेटने त्याने 723 रन बनवले आहेत.  विजय हजारे टुर्नामेंटमध्ये त्याने ३ शतकं झळकावली.

सचिनला टाकलं मागे

मयंकने आतापर्यंत या सीजमनमध्ये 2101 रन केले आहेत. त्याने श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड मोडला आहे. 2015-16 सीजनमध्ये अय्यरच्या नावावर 1947 रन होते. वसीम जाफरने 2008-09 मध्ये 1907 रन केले होते. तिसऱ्या नंबरवर वसीम आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 109, 84, 28, 102, 89, 140, 81 आणि 90 अशा इनिंग खेळल्या आहेत. फक्त एकदाच तो ५० पेक्षा कमी रनवर आऊट झाला आहे. टूर्नामेंटमध्ये त्याने 723 रन केले आहेत. .यासोबतच त्याने सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकले आहे. सचिनने 2003 मध्ये सीडब्ल्यूसी टूर्नामेंटमध्ये 673 रन बनवले आहेत.