नवी दिल्ली : भारतीय संघातील युवा क्रिकेटर जयंत यादवचे वडील जयसिंह यांचे हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना किडनीचा त्रासही होता.
जयसिंह स्वत: एक क्रिकेटर होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ते खेळलेत. जयसिंह यांचे भाऊ योगेंद्र यादव यांनी निधनाची बातमी दिली.
गेल्या वर्षी जयंत यादवने भारतीय संघात पदार्पण केले. जयंतने ४ कसोटी आणि एका वनडेत भारताचे नेतृत्व केलेय. जयंतने कसोटीमध्ये नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतकही ठोकलेय. हा विक्रम करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरलाय.