'कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना', कृणाल पंड्याचा पत्नीसोबत भन्नाट डान्स, व्हिडीओ

कृणाल आणि त्याच्या पत्नीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Updated: Mar 19, 2021, 08:05 AM IST
'कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना', कृणाल पंड्याचा पत्नीसोबत भन्नाट डान्स, व्हिडीओ

मुंबई: भारतीय संघातील ऑलराऊंडर खेळाडू कृणाल पंड्यानं आपल्या कामगिरीतून क्रिकेटप्रेमींची मनं जिंकत असतोच. त्याचा आणखी एक भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कृणाल पंड्या पत्नीसोबत डान्स करण्याचा आनंद लुटत आहे. कृणाल दोघांच्याही डान्सचा व्हिडीओ चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

कृणाल सध्या आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईत वेळ घालवत आहे. कृणाल आपल्या पत्नीसोबत अनेक रोमँटिक फोटोही शेअर करत असतो . या क्युट कपलनं केलेल्या डान्सचा व्हिडीओ देखील चर्चेत आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Krunal himanshu Pandya (@krunalpandya_official)

कृणाल पांड्याने एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो पत्नी पंखुरी शर्मासोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. 'बंटी और बबली' चित्रपटातील 'कजरारे-कजरारे तेरे कारे कारे नैना' या गाण्यावर तो डान्स करताना दिसत आहे.

कृणाल पंड्या आणि पंखुरी शर्मा यांचा हा सुपर डान्स व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे हे गाणे बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका अलीशा चिनॉय यांनी गायले होते. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी केलेला डान्सच नाही तर हे गाणंही खूप गाजलं आहे.