CSK साठी खलनायक ठरला हा खेळाडू, प्रत्येक मॅचमध्ये 'तोच' पराभवाचं कारण?

या खेळाडूमुळे सतत CSK ला मिळतोय पराभव? तुम्हाला काय वाटतं याला जडेजानं पुन्हा संधी द्यावी का?

Updated: Apr 4, 2022, 09:35 AM IST
CSK साठी खलनायक ठरला हा खेळाडू, प्रत्येक मॅचमध्ये 'तोच' पराभवाचं कारण? title=

मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम चेन्नईसाठी अत्यंत वाईट जात आहे. सुरुवातच पराभवापासून झाली. एवढंच नाही तर एकामागे एक 3 पराभवांना सामोरं जावं लागलं. पंजाब विरुद्धच्या साामन्यातही चेन्नईचा 54 धावांनी पराभव झाला आहे. टीममधील एक धडाकेबाज फलंदाज जो टीमची शान होता तोच खलनायक होत आहे. 

या खेळाडूच्या खराब फॉर्मचा तोटा टीमला होत आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात या खेळाडूला संधी देणार की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा खेळाडू आता चाहत्यांच्या मनातूनही उतरत आहे. कोण आहे हा खेळाडू आणि त्याचा तोटा टीमला कसा होतो जाणून घेऊया.

पंजाब विरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई संघाला 54 धावांनी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्याआधी चेन्नईला कोलकाताने 6 विकेट्सने पराभव केला. लखनऊनेही 6 विकेट्स राखून पराभव केला. 

तिन्ही सामन्यात ओपनर फलंदाज ऋतुराज गायकवाडची कामगिरी अत्यंत वाईट होती.  प्रत्येक सामन्यातील पराभवाचे सर्वात मोठे कारण ऋतुराज गायकवाड ठरल्याची चर्चा आहे.  कोलकाता विरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड शून्यवर आऊट झाला.त्यानंतर ऋतुराज गायकवाड लखनौविरुद्ध जेमतेम 1 धावा आणि पंजाबविरुद्ध 1 धावा काढून आऊट झाला. 

प्रत्येक सामन्यात पराभवाचं कारण हा खेळाडू? 
ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या पराभवाचं कारण ठरत आहे. त्याच्या खराब कामगिरीमुळे टीमवर दडपण येतं. त्याच्या फ्लॉप शोनंतर इतर खेळाडूंचं मनोबल ढासळत असल्याचं दिसत आहे. ऋतुराज गायकवाडने गेल्यावर्षी सर्वाधिक 635 धावा केल्या.

यंदाच्या मोसमात ऋतुराजची बॅट फारशी चालताना दिसली नाही. 25 वर्षीय ऋतुराज गायकवाडचा टी-20 मधील रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याच्या नावावर 16 अर्धशतकं आहेत. मात्र एवढं सगळं असतानाही यावेळी ऋतुराज गायकवाडला झालंय तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

चेन्नई संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब टीमने 54 धावांनी विजय मिळवत बल्ले बल्ले केलं. पंजाबचा हा दुसरा विजय आहे. चेन्नईनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबने त्यांना 181 धावाचं लक्ष्य दिलं. चेन्नई टीम 126 धावांवर तंबुत परतली.