close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

CWG 2018 : वर्ल्ड नंबर 1 के. श्रीकांतचं सुवर्णपदक हुकलं

   कॉमनवेल्थ खेळामध्ये पी.व्ही सिंंधूवर मात  करत सायना  नेहवालने महिलांंच्या बॅटमिंंटन स्पर्धेत सुवर्णपदक  पटकावले.

Updated: Apr 15, 2018, 09:16 AM IST
CWG 2018 : वर्ल्ड नंबर 1 के. श्रीकांतचं सुवर्णपदक हुकलं

मुंंबई :   कॉमनवेल्थ खेळामध्ये पी.व्ही सिंंधूवर मात  करत सायना  नेहवालने महिलांंच्या बॅटमिंंटन स्पर्धेत सुवर्णपदक  पटकावले. सायना नेहवालनंतर पुरूष एकेरी बॅटमिंंटन स्पर्धेमध्येही भारताला सुवर्णपदकाची आशा होती. मात्र ते हुकले आहे.  राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलंय. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतला पराभवचा सामना करावा लागला.

 

 

के. श्रीकांतला रौप्यपदक 

बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या श्रीकांतचा मलेशियाच्या ली चाँग वुईने 2-1 अशा फरकाने पराभव केला. चाँग वुईने श्रीकांतचा 21-19 , 14-21 आणि 14-21 असा पराभव केला. श्रीकांतने पहिला गेम जिंकून 21-19 अशा परकारने जिंकून सुवर्णपदाकाकडे वाटचाल केली होती. मात्र दुसऱ्या गेममध्ये लीनं दमदार पुनरागमन केलंय. ली चाँग वुईने दुसरा गेम 14-21 असा मोठ्या फरकाने जिंकत श्रीकांतवर आघाडी मिळवली. दुस-या गेममध्ये आघाडी घेतल्यानंतर चाँग वुईने तिसरा गेम सहज जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.