CWG 2018 : पूनम यादव पाठोपाठ 'या' महिला खेळाडूने पटकवले सुवर्णपदक

  २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आज भारतीयांची सकाळ 'गोल्डन संडे' झाली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने आणि पाठोपाठ 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात 16 वर्षीय मनू भाकरने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलंय.

Updated: Apr 8, 2018, 08:52 AM IST
CWG 2018 :  पूनम यादव पाठोपाठ 'या' महिला खेळाडूने पटकवले सुवर्णपदक  title=

ऑस्ट्रेलिया :  २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आज भारतीयांची सकाळ 'गोल्डन संडे' झाली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने आणि पाठोपाठ 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात 16 वर्षीय मनू भाकरने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलंय.

वेटलिफ्टिंगमध्ये  पूनम यादवने सुवर्णपदक पटकावलंय. 69 किलो वजनी गटात पूनमने ही सुवर्ण कामगिरी करुन दाखवलीय. तर 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात हिना सिद्धूनेही रौप्य पदक जिंकण्याची किमया साधलीय. पूनम, मनूच्या या सुवर्णपदकामुळे भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत सहा सुवर्णपदकांची कमाई केलीय. सहापैकी चार सुवर्णपदके ही महिलांनी जिंकली आहेत. दुसरीकडे महिला बॉक्सिंगमध्ये मेरी कॉमने उपांत्य फेरीत धडक मारलीय. त्यामुळे भारताचं आणखी एक पदक निश्चित मानलं जातंय. 

 

 पूनम यादव वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलंय. 69 किलो वजनी गटात पूनमने ही सुवर्ण कामगिरी करुन दाखवलीय. अंतिम फेरीमध्ये इंग्लंडच्या सारा डेविसने 128 किलोग्रामचे वजन उचलण्याचा प्रयत्न केला, परंतू तो असफल झाल्याने पूनमच्या पारड्यात सुवर्णपदक पडले.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पूनमचे अभिनंदन केलंय. पूनम आणि मनूच्या या सुवर्णपदकामुळे भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत 6 सुवर्णपदकांची कमाई करण्यात यश मिळाले आहे.