शेवटच्या सामन्यात OUT होताच भावूक झाला Dean Elgar; विराटच्या कृत्याची होतेय चर्चा!

Dean Elgar: दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मुकेश कुमारने डीन एल्गरला बाद केलं होतं. डीन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा तो भावूक झाला होता.

सुरभि जगदीश | Updated: Jan 4, 2024, 09:09 AM IST
शेवटच्या सामन्यात OUT होताच भावूक झाला Dean Elgar; विराटच्या कृत्याची होतेय चर्चा! title=

Dean Elgar: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून केपटाऊनमध्ये दुसरी टेस्ट खेळवली जातेय. बुधवारपासून या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी दोन्ही टीम्सची अवस्था बिकट होती. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ( Dean Elgar ) चा हा शेवटचा सामना आहे. त्याने निवृत्ती जाहीर केली असून तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळतोय. ही सिरीज त्याच्या कारकिर्दीतील शेवटची सिरीज असल्याचं त्याने जाहीर केलं होतं.

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मुकेश कुमारने डीन एल्गरला बाद केलं होतं. डीन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा तो भावूक झाला होता. यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व भारतीय खेळाडूंनी त्याला शानदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. 

Dean Elgar ला टीम इंडियाच्या खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यात, इतिहासात दुसऱ्यांदा असं घडले की एकाच दिवशी दोन्ही संघ सर्वबाद झाले. याशिवाय हा टेस्ट सामनाही संस्मरणीय ठरला आहे. मुख्य म्हणजे डीन एल्गरचा हा शेवटचा सामना होता. या सामन्यात मोहम्मद सिराजने त्याला पहिल्या डावात बाद केला तर दुसऱ्या डावात 12 रन्सवर मुकेश कुमारने बाद केलं. दुसऱ्या डावात विकेट गमावल्यानंतर डीन एल्गर भावूक होऊन पॅव्हेलियनकडे चालला होता.

यावेळी रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडूंनी त्याचं अभिनंदन केले. अशातच मैदानात उपस्थित विराट कोहलीने त्याचा खास पद्धतीने निरोप घेतला. विराटने मैदानात उपस्थित प्रेक्षकांना डीन एल्गरसाठी झुकण्यास सांगितलं. मग त्याने स्वतः त्याला जाऊन मिठी मारली आणि त्याचा निरोप घेतला. या हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आफ्रिकेनंतर टीम इंडियाचीही खराब सुरुवात

दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताच्या डावाची सुरवातच खराब झाली. ओपनिंगला आलेला यशस्वी जयस्वाल खात न उघडताच बाद झाला. भारतीय इनिंगमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक रन्स केले. विराटने 59 बॉल्समध्ये 46 रन्स केल्या. तर कर्णधार रोहित शर्मा 39 आणि शुभमन गिलने 36 रन्स केले. 153 धावसंख्येवर भारताला पाचवा धक्का बसला. केएल राहुल (KL Rahul) 8 रन्स करुन बाद झाला. लुंगी एनगिडीने 34 व्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर राहुलची विकेट घेतली. 

या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर केएल राहुल (8) बाद झाला. तर तिसऱ्या बॉलवर रवींद्र जडेजा (0) पॅव्हेलिअनमध्ये परतला. पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराह (0) बाद झाला. 35 व्या षटकात कागिसो रबाडाने दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. त्याच षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराज (0) धावबाद झाला. तर 5 व्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णा (0) अॅडम मार्करमच्या हाती झेल देऊन माघारी परतला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x