FIFA World Cup ट्रॉफी लॉन्चसोबत Deepika Padukone नं रचला इतिहास!

 Deepika Padukone FIFA World Cup 2022 : Deepika Padukone लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे. 

Updated: Dec 19, 2022, 11:43 AM IST
FIFA World Cup ट्रॉफी लॉन्चसोबत Deepika Padukone नं रचला इतिहास! title=

Deepika Padukone FIFA World Cup 2022 : सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनलमध्ये अर्जेटिंनानं थरारक विजय मिळवलाय.. फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली... आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकून घेतलाय. कतारच्या लुआस स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्स हा रंजक सामना झाला. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone)  उपस्थितीत हा सामना खास ठरला. दीपिकानं फिफा वर्ल्ड कप 2022 ची ट्रॉफी लॉन्च केली. यासोबत दीपिकानं एक नवा रेकॉर्ड केला आहे. फिफा ट्रॉफी लॉन्च करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. 

6.175 किलो वजनाची आणि 18-कॅरेट सोने आणि मॅलाकाइटनं बनवलेल्या या ट्रॉफीला खूप कमी लोक पकडणायचे सोडा तर स्पर्श सुद्धा करू शकतात. यात माजी फिफा विश्वचषक विजेते आणि राष्ट्रप्रमुखांचा यात समावेश आहे. अशा परिस्थितीत दीपिका सोबत संपूर्ण भारतासाठी हा खूप खास क्षण ठरला. ट्रॉफी लॉन्च दरम्यान दीपिकानं स्पॅनिश फुटबॉलपटू इकर कॅसिलास फर्नांडीझसोबत स्टेडियममध्ये प्रवेश केला. हा क्षणही उत्साहाने भरलेला होता.

हेही वाचा : गर्लफ्रेंड असूनही अरबाजला खरंच Malaika Arora शी पुन्हा करायचं लग्न? जाणून घ्या Inside Story

यावेळी दीपिकानं पांढरा शर्ट, तपकिरी ओव्हरकोट, ब्लॅक बेल्ट परिधान केला होता. दीपिकाचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. संपूर्ण भारताला दीपिकावर अभिमान आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून, ती ज्युरी सदस्य बनली, ते 'गोल्डन रेशो ऑफ ब्युटी' नुसार जगातील टॉप 10 सर्वात सुंदर महिलांच्या यादीत एकमेव भारतीय असण्यापर्यंत, दीपिकाने जागतिक स्तरावर आपल्याला गर्वरीत केले आहे. लक्झरी ब्रँड आणि अगदी पॉप कल्चर ब्रँडसाठी जागतिक चेहरा म्हणून निवडलेली दीपिका ही एकमेव भारतीय आहे. दोन वेळा टाईम मॅगझिन अवॉर्ड विजेते. जगातील विविध क्षेत्रांतील लीडर्ससोबत ती दिसते. 

दरम्यान, सामना संपल्यानंतर अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. या वर्ल्डकपनंतर तो कधीही निवृत्त होऊ शकतो, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर अखेर मेस्सीने मौन सोडलं आहे. आपल्या लाडक्या मेस्सीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

काय म्हणाला मेस्सी? 

विश्वचषक विजेतेपद जिंकल्यानंतर तो अर्जेंटिनातून निवृत्त होणार नाही.  मेस्सीने TyC स्पोर्ट्सला सांगितले की, ''तो अर्जेंटिनासाठी आणखी काही काळ खेळत राहण्याचा मानस आहे." , मी अर्जेंटिना राष्ट्रीय संघातून निवृत्त होणार नाही. मला चॅम्पियन म्हणून खेळणे सुरू ठेवायचं आहे, आहे.