close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फिफा फुटबॉल : जर्मनी स्पर्धेतून आऊट, दक्षिण कोरियाचा सनसनाटी विजय

फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये विश्वविजेत्या जर्मनीला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 27, 2018, 10:09 PM IST
फिफा फुटबॉल : जर्मनी स्पर्धेतून आऊट, दक्षिण कोरियाचा सनसनाटी विजय
Pic courtesy: Twitter/@DFB_Team

मॉस्को : २१ व्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह जोरात आहे. आजच्या जर्मनी आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामन्याकडे लक्ष लागले होते. मात्र, विश्वविजेत्या जर्मनीला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे जर्मनी स्पर्धेतून बाद झालाय. दक्षिण कोरियाच्या संघाने सनसनाटी विजय मिळवून फुटबॉल विश्वात आपणही मागे नाही, हे दाखवून दिले.

माजी विश्वविजेत्या जर्मनी टीमला दक्षिण कोरियाकडून धक्कादायक पराभवावा सामना करावा लागला. या पराभवामुळे जगज्जेत्या जर्मनीवर साखळी फेरीमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे. दक्षिण कोरियाने अखेरच्या चार मिनिटांमध्ये दोन गोल करत विश्वविजेत्यांना घरचा रस्ता दाखवला.

Germany suffer a humiliating 0-2 loss to South Korea, crash out of FIFA World Cup 2018

बलाढ्य जर्मनीला कोरियाने २-० असे पराभूत करत स्पर्धेचा शेवट गोड केला. संपूर्ण सामन्याच्या नियमित वेळेत दोनही संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे या सामन्याकडे लक्ष लागले होते. मात्र, अखेरच्या क्षणी दक्षिण कोरिया संघाने कमाल केली. शेवटच्या चार मिनिटांत सामना फिरवला. पहिला गोल नोंदवून जर्मनीवर आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा गोल करत जर्मनीचा गेम संपवून टाकला. त्यामुळे जर्मनीला स्पर्धेतूनच बाहेर पडावे लागलेय.