Rohit Sharma : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind vs Aus ) यांच्यामध्ये झालेल्या वनडे सिरीजमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला क्लिन स्विप देण्यात अपयशी ठरली. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 66 रन्सने पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाचं ( Team India ) ऑस्ट्रेलियाला 3-0 असं क्लिन स्विप देण्याचं स्वप्न भंगलं. 353 रन्सच्या लक्ष्याच पाठलाग करताना टीम इंडियाचे फलंदाज पत्त्याप्रमाणे ढेपाळले. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) वर्ल्डकप संदर्भात मोठं विधान केलं आहे.
3 सामन्यांच्या या वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाने अगोदर बाजी मारली होती. केएल. राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या 2 वनडे सामन्यांमध्ये विजय मिळवून सिरीज आपल्या नावे केली होती. ऑस्ट्रेलियाविरूद्धची ही सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जात होती.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, मी माझ्या कामगिरीने फार खूश आहे. जर मी अशा पद्धतीने खेळी केली तर मी नक्कीच फार खूश आहे. गेल्या 7-8 वनडे सामन्यांमध्ये आण्ही विविध पद्धतीने खेळ केलाय. आमच्यासमोर अनेक आव्हानं आणि त्या आव्हानांचा आम्ही चांगल्या पद्धतीने सामना केला. मात्र या सामन्याचा परिणाम आमच्या बाजूने नव्हता, परंतु आम्ही एकंदरीत चांगला खेळ केला.
जसप्रीत बुमराह बद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “बुमराहच्या गोलंदाजीवर मी खूप खूश आहे. त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कसं वाटतंय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जेव्हा आम्ही टीमबद्दल बोलतो तेव्हा आम्हाला काय हवंय याबद्दल आम्ही अगदी स्पष्ट असतो. आम्ही अजिबात गोंधळलेले नाही, आम्हाला माहित आहे की, आम्ही एक संघ म्हणून काय करतोय. यावेळी प्रत्येकाने आपली भूमिका बजावावी अशी आमची इच्छा आहे.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन टीमने प्रथम फलंदाजी करत 353 रन्सचं टार्गेट दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. रोहितने अवघ्या 57 बॉल्समध्ये 6 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 81 रन्स केले. मात्र त्याची खेळी टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही. रोहित शर्माशिवाय टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनेही 61 बॉल्समध्ये 56 रन्सची खेळी केली.