Har ghar Tiranga : टीम इंडियाच्या खेळाडूंनी असा साजरा केला Independence Day, पाहा फोटो

क्रिकेटच्या देवापासून ते हार्दीक पंड्यापर्यत...खेळाडूंकडून उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा, फोटो पाहिलेत का? 

Updated: Aug 15, 2022, 04:05 PM IST
Har ghar Tiranga : टीम इंडियाच्या खेळाडूंनी असा साजरा केला Independence Day, पाहा फोटो  title=

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरी करत आहे. बॉलिवू़ड अभिनेत्यांपासून क्रिकेटर्सपर्यंत सर्वांनीच हा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा केला. यानिमित्त पाहूयात टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वातंत्र्य दिन साजरा केलेले काही फोटोज.  

क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरनेही आपल्या घरी तिरंगा फडकवला. सचिनने 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत घरी तिरंगा फडकावून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीही स्वातंत्र्याच्या जल्लोषात सामील झाला आहे. विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत तिरंगा फडकवला आहे. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्माने तिरंगा फडकवतानाचा फोटो शेअर केला आहे.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजानेही चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 

स्टार अष्टपैलू खेळाडू आणि आयर्लंडमध्ये टीम इंडियाचे कर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याने त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हार्दिक पांड्या येथे पारंपारिक लूकमध्ये असून तो तिरंगा फडकावत आहे.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंशिवाय त्यांच्या कुटुंबानेही स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मानेही पारंपारिक लूकमध्ये फोटो शेअर केले आणि चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.