श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीचे तीन विक्रम

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ९३ रन्सनी दणदणीत विजय झाला.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 21, 2017, 04:38 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीचे तीन विक्रम  title=

कटक : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ९३ रन्सनी दणदणीत विजय झाला. या मॅचमध्ये धोनीनं बॅटिंगसोबतच जबरदस्त विकेट किपींग करून भारताचा विजय सोपा केला. याबरोबरच धोनीनं दोन विक्रमही केले आहेत. 

चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या धोनीनं २२ बॉल्समध्ये ४ फोर आणि १ सिक्स मारून ३९ रन्स केल्या. धोनीनं शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला सिक्स मारून भारताचा स्कोअर १८० पर्यंत नेला. या सिक्सबरोबरच धोनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलवर सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू बनला आहे.

धोनीनंतर श्रीलंकेचा अंजलो मॅथ्यूज, बांग्लादेशचा मशरफे मुर्तजा, शफीकुल्लाह आणि न्यूझीलंडच्या नॅथन मॅक्कलमनं टी-20मध्ये २-२ वेळा शेवटच्या बॉलवर सिक्स मारली आहे.

धोनीनं बॅटबरोबरच विकेट किपींग करतानाही विक्रमाची नोंद केली आहे. धोनीनं या मॅचमध्ये दोन कॅच आणि दोन स्टम्पिंग केले. यामुळे धोनीच्या घरगुती आणि आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये २०० विकेट झाल्या आहेत. धोनीच्या पुढे आता पाकिस्तानचा कामरान अकमल आहे. अकमलनं २०७ विकेट घेतल्या आहेत.

स्टम्पिंगच्या बाबतीत धोनीनं दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचं सर्वाधिक ७२ स्टम्पिंगचं रेकॉर्ड मोडलं आहे. धोनीच्या नावावर आता ७४ स्टम्पिंग आहेत.