फायनल मॅचआधी धोनी झाला भावूक

पाहा का झाला धोनी भावूक

Updated: May 27, 2018, 04:44 PM IST
फायनल मॅचआधी धोनी झाला भावूक title=

मुंबई : आयपीएल 2018 मध्ये 2 वर्षाच्या बंदीनंतर पुन्हा आगमन करणारी चेन्नई टीम मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर आज सातव्यांदा फायनलमध्ये धडक देणार आहे. पहिल्या क्वालीफायर सामन्यात हैदराबादचा पराभव करत महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात आज पुन्हा त्यांचा सामना हैदराबाद सोबत होणार आहे. फायनल सामन्याआधी धोन मीडिया सोबत बोलतांना भावूक झाला. मोदींने यावेळी भावनात्मक गोष्टींवर चर्चा केली. 

चेन्नईच्या संघाला कावेरी पाणी वादाचा देखील सामना करावा लागला. ज्यामुळे त्यांना त्यांच्या होम ग्राऊंडमध्ये सामने खेळता नाही आले. चेन्नईला दुसरं होमग्राऊंड निवडावं लागलं. आयपीएलच्या या सीजनमध्ये पुण्याचं मैदान मग चेन्नईचं होम ग्राऊंड बनलं.

फायनल सामन्याआधी भावूक झालेल्या धोनीने म्हटलं की, ''टूर्नामेंटची सुरुवात खूप भावनात्मक होती. पण तुम्हाला भावूक न होता प्रोफेशनल रहावं लागतं. चेन्नईमध्ये सामने न खेळता आल्याने आम्ही थोडं निराश होतो. आमची इच्छा होती की आम्हाला चेन्नईच्या मैदानावर खेळता यावं. कारण मागील 2 वर्षांपासून आमचे फॅन्स आमची वाट बघत होते.'

महेंद्र सिंह धोनीने म्हटलं की, 'मागची 2 वर्ष आम्ही टूर्नामेंटमध्ये नव्हतो. पण आमचे फॅन-फॉलोअर्स तरी वाढत होते. त्यामुळे हे दुर्भाग्यपूर्ण आहे की आम्हाला चेन्नईमध्ये खेळायला नाही मिळालं.'