ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेआधीच धोनीला दुखापत

नेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत

Updated: Mar 1, 2019, 04:20 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेआधीच धोनीला दुखापत title=

हैदराबाद : हैदराबादमध्ये शनिवारी भारतीय टीमच्या नेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पहिली वनडे २ मार्चपासून सुरु होणार आहे. 37 वर्षाच्या धोनीच्या हाताला दुखापत झाली आहे. पहिल्य़ा वनडेच्या आधी धोनी सराव करत होता. राघवेंद्रच्या बॉलिंगवर त्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर धोनीने सराव न करण्याचा निर्णय घेतला. ही दुखापती किती गंभीर आहे याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण संध्याकाळ पर्यंत धोनी पहिला सामना खेळणार की नाही हे स्पष्ट होईल.

जर धोनीला दुखापतीमुळे खेळता नाही आलं तर ऋषभ पंत त्याच्या जागी विकेटकीपिंग करेल. धोनीच्या ऐवजी बॅट्समन म्हणून लोकेश राहुल किंवा अंबाती रायडूचा देखील संघात समावेश होऊ शकतो.

भारतीय टीमनं घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० सीरिज गमावली. दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा ७ विकेटनं पराभव केला. याचबरोबर ऑस्ट्रेलियानं ही टी-२० सीरिज २-०नं जिंकली. या पराभवानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.