ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी हा खेळाडू सर्वात आधी पोहोचला चेन्नईमध्ये

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच वनडे सामने येत्या १७ तारखेपासून सुरु होणार आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय खेळाडू आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहेत.

Updated: Sep 14, 2017, 05:12 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी हा खेळाडू सर्वात आधी पोहोचला चेन्नईमध्ये title=

चेन्नई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच वनडे सामने येत्या १७ तारखेपासून सुरु होणार आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय खेळाडू आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहेत.

भारतीय टीम आता यापुढे अनेक टेस्ट सामने खेळणार आहे. त्यामुळे अनेक खेळाडु सध्या आपल्या कुटुंबियांना वेळ देत आहेत. विराट कोहलीने देखील त्याआधी जाहिरात शूट करून घेतली आहे. सामन्यांसाठी भारतीय खेळाडू आता चेन्नईमध्ये दाखल होऊ लागले आहेत.

सर्वात आधी भारतीय खेळाडूंमध्ये एमएस धोनी हा चेन्नईमध्ये पोहोचला आहे. इतर खेळाडू आज पोहोचणार आहेत. धोनी आणि चेन्नई शहराचे विशेष नाते आहे. धोनीचा मोठा चाहतावर्ग या शहरात आहे. ८ आयपीएल हंगामात धोनीने चेन्नई संघाचं नेतृत्व केलं आहे.