धोनीने शेवटच्या सामन्यात केली अशी कमाल

टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मध्ये न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. पावसामुळे उशिरा सुरु झालेल्या या 8 ओव्हरच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने लवकर विकेट्स गमावल्या. त्यामुळे काही मोठा स्कोर भारतीय संघ उभा नाही करु शकला. त्यामुळे भारतीय संघ हारतो की काय असं अनेकांना वाटलं होतं.

Updated: Nov 8, 2017, 10:25 AM IST
धोनीने शेवटच्या सामन्यात केली अशी कमाल title=

मुंबई : टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मध्ये न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. पावसामुळे उशिरा सुरु झालेल्या या 8 ओव्हरच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने लवकर विकेट्स गमावल्या. त्यामुळे काही मोठा स्कोर भारतीय संघ उभा नाही करु शकला. त्यामुळे भारतीय संघ हारतो की काय असं अनेकांना वाटलं होतं.

भारतीय संघाच्या गोलंदाजांनी काल अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखून धरलं आणि विकेट पाडण्यास भाग पाडलं. आपल्या जबरदस्त विकेट किपिंगमुळे प्रसिद्ध असलेला भारताची सर्वात यशस्वी माजी कर्णधार धोनीने शेवटच्या सामन्यामध्ये देखील एक जबरदस्त रनआऊट करत सामन्यावर आणखी भारताची पकड मजबूत करुन दिली.

धोनीने ओव्हर थ्रोमध्ये रन चोरण्याच्या प्रयत्न करणाऱ्या टॉम ब्रुसला रनआऊट करत भारताला विजयाच्या आणखी जवळ आणून ठेवलं. धोनीने प्रत्येक सामन्यात त्याच्या किपिंगमधून अशीच उत्तम कामिगिरी केली आहे.

पाहा व्हिडिओ