दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने यावर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. जगातील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीने क्रिकेट विश्वात एक दशक राज्य केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने धोनीची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे. आयसीसीने धोनीची निवड ICC Spirit of Cricket Award of the Decade अवॉर्डसाठी केली आहे.
जगातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनी ओळखला जातो. क्रिकेट इतिहासातील कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख आहे. मैदानावर धोनी अत्यंत दुर्मिळ प्रसंगींच चिडला आहे. सोमवारी आयसीसीने धोनीची त्याच्या खेळ भावनेसाठी त्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली.
आयसीसीच्या पुरस्काराविषयी सोशल मीडियावर माहिती देताना, बोर्डाच्या वतीने धोनीने जाहीर केले की दशकाचा आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड म्हणून निवड झाली आहे. 2011 मध्ये इंग्लंडच्या नॉटिंघॅम येथे खेळल्या जाणार्या कसोटी सामन्यात धावबाद झाल्यानंतरही इयान बेलला भारतीय कर्णधाराने परत बोलावले. चाहत्यांनी धोनीच्या या निर्णयाचे कौतुक केले आणि हा सन्मान त्याला पात्र होता.
MS DHONI wins the ICC Spirit of Cricket Award of the Decad
The former India captain was chosen by fans unanimously for his gesture of calling back England batsman Ian Bell after a bizarre run out in the Nottingham Test in 2011.#ICCAwards | #SpiritOfCricket pic.twitter.com/3eCpyyBXwu
— ICC (@ICC) December 28, 2020
धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. 2007 मध्ये भारताने टी-20 विश्वचषक जिंकला तर 2011 मध्ये त्याने वनडे विश्वचषक जिंकला. 2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.