DHONI चा पुन्हा सर्वानाच आश्चर्याचा धक्का, धोनीने का सोडलं CSK चे कर्णधारपद?

Dhoni ने आपल्या निर्णयाने पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही कदाचित बॅडन्यूज असेल.

Updated: Mar 24, 2022, 03:49 PM IST
DHONI चा पुन्हा सर्वानाच आश्चर्याचा धक्का, धोनीने का सोडलं CSK चे कर्णधारपद? title=

मुंबई : महेंद्रसिंह धोनीने (Dhoni) पुन्हा एकदा आपल्या निर्णयाने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्याने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले आहे. जडेजा दीर्घकाळापासून चेन्नई संघासोबत आहे. तो 2012 पासून चेन्नई संघात खेळत आहे. चेन्नईचा कर्णधार (CSK captain) बनणारा तो तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी धोनी आणि सुरेश रैनाने (Suresh Raina) संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. (Why dhoni resign as a CSK captain)

चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) अधिकृत विश्वनाथन म्हणाले की, धोनीला नेतृत्वात सहज बदल करायचे आहेत. आणि त्याला वाटते की जडेजा कर्णधारपद स्वीकारण्यास तयार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गेल्या वर्षी विजेतेपद पटकावले होते. धोनीने गुरुवारी संघाच्या बैठकीत याची घोषणा केल्याचे विश्वनाथन यांनी सांगितले. प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी ही माहिती देण्यात आली.

चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना 26 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सशी (CSK VS KKR) होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणार आहे.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा कर्णधार होऊ शकतो, असे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी आधीच सांगितले होते. धोनीने दोन सामन्यांसाठी विश्रांती घेण्याचे ठरवले तर जडेजा कमान सांभाळू शकतो, असे ते म्हणाले होते.

विश्वनाथन पुढे म्हणाले, 'महेंद्रसिंह धोनी याचा विचार करत होता. जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्याची वेळ आली आहे, असे धोनीला वाटले. त्याला वाटते की जद्दू त्याच्या कारकिर्दीतील प्रमुख फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्याकडे चेन्नईचे कर्णधारपद सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे. कदाचित ते फ्रँचायझीसाठी चांगले होईल, असे त्यांच्या मनात आले होते.'