Ind vs Pak: मोहम्मद सिराजने मुद्दाम रिझवानला बॉल फेकून मारला? काय म्हणाले सुनील गावस्कर?

India vs Pakistan ICC T20 World Cup 2024: भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने संपूर्ण 20 ओव्हर्स खेळल्या नाहीत. यावेळी भारताची टीम 19 ओव्हर्समध्ये ऑलआऊट झाली होती.

सुरभि जगदीश | Updated: Jun 11, 2024, 07:21 AM IST
Ind vs Pak: मोहम्मद सिराजने मुद्दाम रिझवानला बॉल फेकून मारला? काय म्हणाले सुनील गावस्कर? title=

India vs Pakistan ICC T20 World Cup 2024: चाहत्यांना तसंच क्रिकेट प्रेमींना ज्या सामन्याची उत्सुकता होती, तो सामना अखेर रविवारी खेळवला गेला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान एकमेकांशी भिडले. या सामन्यात भारताने 6 रन्सने पाकिस्तानचा पराभव केला. मात्र या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वच जण हैराण झाले होते. 

भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने संपूर्ण 20 ओव्हर्स खेळल्या नाहीत. यावेळी भारताची टीम 19 ओव्हर्समध्ये ऑलआऊट झाली होती. टीम इंडियाला यावेळी केवळ 119 रन्स करता आले. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा सामना करायला उतरलेल्या पाकिस्तानच्या टीमने चांगली सुरुवात केली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यात पहिल्या विकेटसाठी २६ रन्सची पार्टनरशिप केली. पाकिस्तानच्या डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने टाकलेल्या थ्रोमुळे सर्वजण चकित आहेत.

नेमका प्रकार काय घडला? 

मोहम्मद रिझवानने दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल गोलंदाजाच्या दिशेने मारला आणि तो क्रिझमधून थोडा बाहेर आला. यादरम्यान सिराजने बॉल पकडला आणि तो स्टंपच्या दिशेने जोरात फेकला. पण तो स्टंपला लागण्यापूर्वीच रिझवानच्या हाताला लागला. यावेळी एका क्षणी असं दिसून आलं की, बॉल रिझवानला खूप जोरात लागला आणि तो जखमी होऊ शकला असता. मात्र त्याला फारशी दुखापत झाली नाही. मात्र सिराजने फेकल्याबद्दल त्याची माफीही मागितली.

दरम्यान 18 व्या ओव्हरमध्ये टाकलेल्या नो बॉलविषयी कमेंट्री करत असताना सुनील गावस्कर यांनी सांगितलं की, अशा स्थितीत कोणत्याही गोलंदाजाने नो-बॉल फेकणं हे अक्षम्य आहे. फलंदाजाची शफलिंग यांना वाइड बॉलसाठी दोष दिला जाऊ शकतो, परंतु नो-बॉलचे कोणतेही समर्थन नाही.

या सामन्यात फलंदाजीमध्ये ऋषभ पंत वगळता सर्वच पाकिस्तान विरुद्ध खराब फ्लॉप ठरले. या सामन्यात ऋषभ पंतने भारताकडून 42 रन्सची खेळी केली. त्याच्यामुळेच टीम इंडियाला 119 रन्सपर्यंत मजल मारता आली. दुसरीकडे अक्षर पटेलने 20 रन्सचं योगदान दिलं. यानंतर जसप्रीत बुमराहने भारतासाठी चांगली कामगिरी केली. अखेरील टीम इंडियाने 6 रन्सने पाकिस्तानला हरवत सामना खिशात घातला.