मुंबई : आयपीएल टीम राजस्थान रॉयल्स आणि त्यांचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यात काहीतरी बिघडलं असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसनने राजस्थान रॉयल्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्स त्याला कायम ठेवण्यास उत्सुक नाही. IPL 2021 मध्ये संजू सॅमसन त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. मात्र संजू एखाद्या गोष्टीबद्दल नाराज आहे. आणि त्याने संघाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अनफॉलो केलंय.
या प्रकरणी फ्रँचायझी आणि कर्णधाराला विचारलं असता, दोघांनीही या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला. त्याचवेळी राजस्थान रॉयल्स मॅनेजमेंटच्या एका सूत्राने याबाबत माहिती दिलीये.
माध्यमांशी बोलताना सूत्रांनी सांगितलं की, “त्याने का अनफॉलो केलं हे आम्हाला माहीत नाही, आमचं भविष्य त्याच्याभोवती तयार झालं आहे, तो आमच्या कायम ठेवण्याच्या यादीत अग्रस्थानी होता. आम्ही देखील यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करतोय."
विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडण्याच्या विचार करतोय. सॅमसनने इंस्टाग्रामवर राजस्थान रॉयल्सला अनफॉलो केलं आहे. फ्रँचायझीने त्याला पुढील हंगामासाठी त्याचं प्राधान्य म्हणून ठेवलं.
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा रॉयल खेळाडू होता आणि त्याने पुढे येऊन संघाचं नेतृत्व केलंय. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी 93 सामने खेळलेत आणि 2391 धावा केल्या. यादरम्यान संजू सॅमसनने 2 शतकं आणि 12 अर्धशतकं झळकावली.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने खराब कामगिरी केली असेल पण संजू सॅमसनने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
टीममध्ये पुनरागमन केल्यापासून, सॅमसनने प्रत्येक आयपीएल हंगामात 300 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. 2021च्या आयपीएलमध्ये संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर, तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक 484 धावा करणारा खेळाडू राहिला.