ENG vs IND, 5th Test : पंत-जाडेजाची शानदार शतकी खेळी, टीम इंडियाच्या पहिल्या डावात 416 धावा

टीम इंडियाचा पहिला डाव 416 धावावर ऑल आऊट झाला आहे. 

Updated: Jul 2, 2022, 04:40 PM IST
ENG vs IND, 5th Test : पंत-जाडेजाची शानदार शतकी खेळी, टीम इंडियाच्या पहिल्या डावात 416 धावा title=

मुंबई :  इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव 416 धावावर ऑल आऊट झाला आहे. ऋषभ पंतच्या सर्वाधिक 146 धावा आणि रविंद्र जाडेजाच्या 104 धावाच्या बळावर टीम इंडियाने ही मोठी धावसंख्या उभारली आहे. तर इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने ५ बळी घेतले. तसेच त्याने 4 मेडन ओव्हर्सही टाकले आहेत. 

टीम इंडियाची पहिल्या डावात खराव सुरुवात झाली होती.  शुभमन गिल 17, पुजारा 13, हनुमा विहारी 20, श्रेयस अय्यर 15 आणि विराट कोहली 11 हे पाचही खेळाडू टीम इंडियाच्या 100 धावांच्या आतच आऊट झाले होते. त्यामुळे मैदाना उतरलेल्या ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजावर दबाव होता. मात्र दोघांनी मोर्चा संभाळत सहाव्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली. या दरम्यान ऋषभ पंतने तक ठोशकलं. त्याने 111 बॉलमध्ये 146 धावा ठोकल्या. तर पहिल्या दिवसअखेर रविंद्र जडेजा ८३ धावांवर तर मोहम्मद शामी खातेही न खोलता नाबाद होते.

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाचं रविंद्र जाडेजाने शतक ठोकलं. रविंद्र जाडेजाने 194 बॉल्समध्ये 104 धावा केल्या होत्या. परदेशात जाडेजाने प्रथमचं शतक ठोकले. जाडेजाने आतापर्यंत तीन शतक ठोकले आहेत. इंग्लंड विरूद्ध जाडेजाने ठोकलेले हे शतक परदेशातले पहिले शतक आहे. तर इतर दोन शतक त्याने मायदेशात ठोकले होते. 

दरम्यान हे शतक ठोकल्यानंतर तो 104 धावावर बाद झाला. जाडेजा बाद झाल्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहनेही तुफान फटकेबाजी केली. त्याने 16 बॉल्समध्ये 31 धावा ठोकल्या आहेत. या छोट्या खेळीत त्याच्या 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तर शार्दुल ठाकूर 1, शामी 16 आणि सिराज 2 धावावर बाद झाला. टीम इंडियाचा संघ 416 धावावर ऑल आऊट झाला.  

 इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने ५ बळी घेतले. तसेच त्याने 4 मेडन ओव्हर्सही टाकले आहेत. तर स्टुअर्ट ब्रॉड कसोटीतील एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा लुटवणारा गोलंदाज ठरला आहे.