England Squad For India Test Series : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्ध होणाऱ्या पाच टेस्ट सामन्यांच्या मालिकेसाठी (IND vs ENG Test Series) टीमची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्धची ही मालिका येत्या 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारतात ही मालिका खेळवली जाणार असल्याने इंग्लंडने आधीच संघाची घोषणा केली आहे. सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे स्टार अष्टपैलू सॅम करन आणि स्टार फलंदाज जॉस बटलर यांना या संघात स्थान मिळालेलं नाही. त्याचबरोबर तीन नव्या छाव्यांना संधी देखील देण्यात आली आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने तीन नवे चेहरे मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शोएब बशीर, टॉम हार्टले आणि गस ऍटकिन्सन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर इंग्लंडने टॉम हार्टले, जॅक लीच आणि रेहान अहमद या तीन फिरकीपटूंचा आपल्या संघात समावेश केलाय. बेन स्टोक्स इंग्लंडच्या संघाचं नेतृत्व करेल. तर जॉनी बेअरस्टो याच्या खांद्यावर उपकर्णधारपद देण्यात आलंय.
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
We have announced our 16-player Test squad to tour India!
Click below to see the squad
— England Cricket (@englandcricket) December 11, 2023
पहिली कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, २५-२९ जानेवारी, हैदराबाद.
दुसरी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, २-६ फेब्रुवारी, विझाग.
तिसरी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, १५-१९ फेब्रुवारी, राजकोट.
चौथी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, २३-२७ फेब्रुवारी, रांची.
5वी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला.