लंडन : भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडच्या टीममध्ये ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं पुनरागमन केलं आहे. इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकताच ५-०नं विजय मिळवला होता. यामुळे इंग्लंडच्या संघाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. त्यातच बेन स्टोक्स टीममध्ये परत आल्यामुळे याचाही इंग्लंडला फायदा होणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये ३ टी-२०, ३ वनडे आणि ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. ३ जुलैपासून टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे.
इओन मॉर्गन(कर्णधार), जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रो, जो रुट, जॉस बटलर, मोईन अली, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, मार्क वूड, टॉम कुरन, जेक बॉल
इओन मॉर्गन(कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्ट्रो, जेक बॉल, जॉस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, अॅलेक्स हेल्स, क्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, जो रुट, जेसन रॉय, डेव्हिड विली, डेव्हिड मलान
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, एम एस धोनी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, सुरेश रैना, उमेश यादव
विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनिष पांडे, एम एस धोनी, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, सिद्धार्थ कौल, उमेश यादव