IND vs ENG 3rd Test Day 1 | जेम्स एंडरसनचा दणका, टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरकडून निराशा

जेम्स एंडरसनच्या (James Anderson) भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने (Team India Top Order) शरणागती पत्कारली.

Updated: Aug 25, 2021, 05:49 PM IST
IND vs ENG 3rd Test Day 1 |  जेम्स एंडरसनचा दणका, टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरकडून निराशा

हेडिंग्ले : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 3rd Test) यांच्यात हेडिंग्ले लीड्समध्ये (Headingley Leeds) तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने (Team India) टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मात्र टीम इंडियाचा बॅटिंग करण्याचा निर्णय चुकीचा ठरताना दिसतोय. बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. जेम्स एंडरसनच्या (James Anderson) भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने शरणागती पत्कारली. जेम्सने सुरुवातीलाच टीम इंडियाला 3 धक्के देत झोकात सुरुवात केली. (England vs India 3rd Test day 1 team india top order fail on james anderson bowling at Headingley Leeds)

पहिल्या ओव्हरपासून विकेटची सुरुवात

लॉर्डसवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत शतकी कामगिरी केलेल्या केएल राहुलने (K L Rahul) निराशा केली. केएलला भोपळाही फोडता आला नाही. जेम्सने सामन्यातील पहिल्याच ओव्हरमधील शेवटच्या म्हणजेच 6 व्या चेंडूवर केएल राहुलला विकेटकीपर जॉस बटलरच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर टीम इंडियाचा तारणहार असलेला चेतेश्वर पुजारालाही (Cheteshwar Pujara)  एंडरसनने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जेम्सने पुजाराला अवघ्या 1 धावेवर आऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाची 2 बाद 4 अशी बिकट स्थिती झाली. 

पुजारा बाद झाल्यानंतर मैदानात कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आला. टीम इंडियाने पहिले 2 विकेट झटपट गमावले. त्यामुळे विराटकडून टीम इंडियाला अपेक्षा होत्या. मात्र विराटने पुन्हा अपेक्षाभंग केला. विराट 7 धावा करुन तंबूत परतला. यामुळे भारताचा स्कोअर 21-3 असा झाला.

टीम इंडियाने अवघ्या 21 धावांवर 3 विकेट गमावल्यानंतर मुंबईकर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)  मैदानात आला. अजिंक्य सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) चांगली साथ दिली. या दोघांनी 35 धावांची भागीदारी केली. दोघे टीम इंडियाचा डाव सावरतील असं वाटतं होतं. तेवढ्यात ही जोडी ओली रॉबिन्सन मोडली. रॉबिन्सनने रहाणेला 18 धावांवर आऊट केलं.