close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

इंग्लंडनं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय

 ट्रेन्टब्रिज कसोटीत इंग्लंडनं नाणेफेक जिंकली असून त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 

Updated: Aug 18, 2018, 04:14 PM IST

मुंबई : इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना आजपासून सुरू होतोय. दोन कसोटीत सपाटून मार खाल्ल्यानंतर टीम इंडिया तिसरा सामना जिंकण्याच्या तयारीत उतरली आहे.  ट्रेन्टब्रिज कसोटीत इंग्लंडनं नाणेफेक जिंकली असून त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय.

रिषभ पंतचं पदार्पण 

इंडिया विरूद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटीत रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. या सामन्यातून रिषभ पंतचं कसोटीत पदार्पण होत आहे. पहिल्याच सामन्यात रिषभ कायय जादू दाखवतो याकडे तमात क्रिकेट चाहत्यांच लक्ष आहे. जसप्रीत बुमराह आणि शिखर धवनचं या सामन्यातून कसोटीत पुनरागमन होतंय.