जाणून घ्या ट्विटरवर का ट्रेंड होतोय लक्ष्मीपती बालाजी

नेटकऱ्यांमध्ये कमालीची चिंता पाहायला मिळाली

Updated: Oct 15, 2020, 11:12 AM IST
जाणून घ्या ट्विटरवर का ट्रेंड होतोय लक्ष्मीपती बालाजी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : चेन्नईच्या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेट संघातील माजी गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी याचं नाव ट्विटरवर अचानकच ट्रेंडमध्ये आलं. त्यातच सोशल मीडियावर व्हायरल झालेलं एक ट्विट भलत्याच चर्चांना वाव देऊन गेलं.

बालाजी एका अपघातात गंभीर जखमी झाल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं गेलं होतं. ट्विटमध्ये जोडण्यात आलेला एका कारचा फोटो हा बालाजीच्याच कारचा असल्याचा दावाही करण्यात आला होता. हे फोटो, ट्विट पाहून क्रीडारसिक आणि नेटकऱ्यांमध्ये कमालीची चिंता पाहायला मिळाली. पण, अखेर हे व्हायरल प्रकरण खोटं असल्याचं स्पष्ट झालं आणि अनेकांनाच दिलासा मिळाला. 

बालाजीचं नाव ट्रेंडमध्ये येण्यास आणखी एक बाब कारणीभूत होती. ट्विटरवरच  'इंडिया 4कॉन्टेस्ट्स' (@india4contests) अकाउंट या अकाऊंटवर एक प्रश्न विचारण्यात आला होता. IPL मध्ये सर्वात पहिली हॅट्रिक कोणत्या गोलंदाजानं घेतली होती? असा तो प्रश्न. 

viral tweet

viral tweet

viral tweet

 

सोशल मीडियावर विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचं उत्तर देत अनेक युजर्सनी बालाजीचं नाव सुचवलं. अनेकांकडून उत्तर म्हणून येणाऱ्या बालाजीच्या नावामुळंच तो ट्विटरवर ट्रेंडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. ज्या नंतर त्याच्या अपघाताचं खोटं वृत्त व्हायरल झालं. पण, अखेर सत्य समोर आल्यानंतर अनेकांचीच चिंता मिटली.  दरम्यान, लक्ष्मीपती बालाजी सध्या IPL 2020 च्या निमित्तानं चेन्नईच्या संघासह दुबईमध्ये आहे.