'फेम आणि पावरने त्याला...' विराट कोहलीबद्दल टीममेटचा मोठा दावा, तर 'रोहित शर्मा आजही...'

Amit Mishra on Virat Kohli : विराट कोहलीला फेम आणि पावरने बदललंय, असा मोठा दावा टीममेटने केलाय. तर रोहित शर्माबद्दलही त्याने सांगितलंय. 

नेहा चौधरी | Updated: Jul 16, 2024, 11:48 AM IST
'फेम आणि पावरने त्याला...' विराट कोहलीबद्दल टीममेटचा मोठा दावा, तर 'रोहित शर्मा आजही...' title=
fame and power Virat Kohli changed a lot amit mishra big statement rohit sharma nature Still the same

Amit Mishra on Virat Kohli : टीम इंडियामधील स्टार खेळाडू म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं नाव जगभरात झालंय. कोहलीने आपल्या खेळाने जगभरात कीर्ती मिळवलीय. तर मुंबईकर आणि हिटमॅन रोहित शर्माने कर्णधार आणि आपल्या खेळाने क्रिकेटप्रेमींचं मनं जिंकलंय. या दोघांनी टी20 वर्ल्ड कप विजयानंतर या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. अशातच अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्रा यांनी दोघांबद्दल मोठं विधान केलंय. (fame and power Virat Kohli changed a lot amit mishra big statement rohit sharma nature Still the same)

'फेम आणि पावरने त्याला...' 

कोहलीसोबत बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या अमित मिश्रा यांनी दावा केलाय की, विराट कोहली प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतर खूप बदलला आहे. एका पॉडकास्ट शो दरम्यान अमित मिश्रा म्हणाला, 'मी विराटला खूप बदलताना पाहिलंय. आमचं बोलणं जवळपास बंद झालंय. जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी आणि सत्ता मिळते, तेव्हा त्यांना वाटते की लोक त्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या उद्देशाने किंवा कामाने बोलायला येतात. मी चिकू (कोहली) 14 वर्षांचा असल्यापासून ओळखतो, जेव्हा तो समोसे खायचा, जेव्हा त्याला रोज रात्री पिझ्झा हवा असायचा. पण माझ्या ओळखीचा चिकू आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात खूप फरक आहे. जेव्हाही तो मला भेटतो तेव्हा तो खूप आदराने वागतो, पण साहजिकच आता पूर्वीसारखे राहिलं नाही.'

रोहित शर्माबद्दल काय म्हणाले अमित मिश्रा?

अमित मिश्रा यांनी विराट आणि रोहित शर्माची तुलना केलीय. ते म्हणाले की, मी खोटं बोलणार नाही. एक क्रिकेटर म्हणून मी त्याचा खूप आदर करतो, पण आता मी त्याच्याशी पूर्वीसारखं संबंध ठेवू शकत नाही.

विराटला कमी मित्र का आहेत? त्याचा आणि रोहितचा स्वभाव वेगळा आहे. मी तुम्हाला रोहितबद्दल सर्वात चांगली गोष्ट सांगतो. मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा आणि आज जेव्हा भेटतो तेव्हा तोच माणूस आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्याशी किंवा परिस्थितीनुसार बदलणाऱ्या व्यक्तीशी अधिक जोडलेलं वाटेल?'