नवी दिल्ली : बांगलादेशचा फास्ट बॉलर तस्कीन अहमदने त्याची प्रेयसी सैय्यदा साबिया नाइमासोबत लग्न केले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याने आपल्या लग्नातील आनंदाचे क्षण शेअरही केले. ते दोघेही आपल्या खाजगी आयुष्यात आनंदात आहेत. पण सोशल मीडियावर अनेकांना हे लग्न खटकल्याचे दिसून येत आहे. अनेकजण त्याला लग्नाच्या शुभेच्छा देण्याऐवजी वाईटट कमेंट करुन ट्रोल करीत आहेत.
बांगलादेशचा हा बॉलर १ महिन्याच्या साऊथ आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यानंतर सय्यदाशी विवाहबद्ध झाला. आफ्रिका दौऱ्यात त्याची कामगिरी निराशाजनक होती. त्या गोष्टीचा राग फॅन्सनी त्याच्या फोटोवर काढला.
तस्कीनने १ नोव्हेंबरला ऑफिशिअल फेसबुक पेजवरुन लग्नाचे फोटो शेअर केले होते. नाइमा ही सुंदर महिला नाही. तस्कीनने यापेक्षा चांगली मुलगी निवडायला हवी होती.
काहींनी तस्कीनच्या वयासंबंधीही प्रश्न उपस्थित केले. तस्कीनने खूपच कमी वयात लग्न केले असून त्याने क्रिकेट करिअरवर लक्ष द्यायला हवे असे म्हटले गेले.
सोशल मीडियावरील या प्रतिक्रीयांसंबंधी तस्कीनला विचारण्यात आल्यावर तो आपल्या निर्णयावर ठाम दिसला. असंख्यजण सोशल मीडियावर असतात, जे चांगल्या संस्कारातले असतात ते चांगले कमेंट्स करतात जे वाईट परिवारातील असतात ते वाईट कमेंट्स करतात असे म्हणत मला या कमेंट्सचा काही फरक पडत नाही असे त्याने सांगितले.
कमी वयात लग्न केल्याबद्दल विचारल्यास तो म्हणते, आज ना उद्या लग्न करायचे तर होते तसेच पालकांची देखील इच्छा होती. साऊथ आफ्रिका दौऱ्यात चांगला खेळ नाही झाला याचा अर्थ असा नाही की मी लग्न करु नये. क्रिकेट माझ्या आयुष्याचा एक भाग आहे, माझे आयुष्य नाही असे त्याने सांगितले.
आम्ही सात वर्षापासून रिलेशनशीपमध्ये होतो. मी जेव्हा तस्कीन अहमद नव्हतो तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. मी १० वीत होतो तेव्हा आमचे रिलेशनशीप सुरू झाले. मी आणि माझा परिवार खूप आनंदात असल्याचे त्याने सांगितले.