मुंबई : जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदज उमरान मलिकने (Umran Malik) आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) आपली छाप सोडली. उमरानने या स्पर्धेत सनरायजर्स हैदराबादकडून (SRH) खेळत होता. त्याने 150 किमीच्या वेगाने बॉल टाकला. ज्यामुळे उमरानचा टी 20 वर्ल्ड कपच्या संघात नेट बॉलर म्हणून संघात समावेश केला. या व्यतिरिक्त त्याची दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या 4 दिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाच्या ए संघात स्थान देण्यात आलं. (faster bowler umran malik fathers abdul rashid malik is fruit seller wants his son to play for indian crikcet team one day)
मुलाच्या कामगिरीमुळे वडील आनंदी
उमरानच्या या कामगिरीमुळे त्याचे वडील अब्दुल राशिद फार आनंदी आहेत. राशिद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्यावेळेस ते म्हणाले की, "उमरान मला म्हणतो की, बाबा मला टीम इंडियाकडून खेळायचंयं.". आमच्या शुभेच्या नेहमीच त्याच्यासोबत आहेत. आम्ही अल्लाहकडे प्रार्थना करतो की, आमचा मुलगाही एक दिवस टीम इंडियाकडून खेळो.
टीम इंडियामध्ये निवड होण्याची आशा
भविष्यात माझी टीम इंडियासाठी निवड होईल, अशी आशा उमरानने व्यक्त केली. "उमरान हा माझा नाही तर देशाचा मुलगा आहे. त्याला खेळताना पाहणं ही माझी एकमेव इच्छा आहे. ज्यामुळे देशाला गर्व होईल. आम्ही फार आनंदी आहोत. संपूर्ण जम्मू-काश्मीर उमरानसाठी आनंदी आहे. देशातून त्याचं कौतुक होतंय. कारण त्याने चांगली गोलंदाजी केली आहे", असं अब्दुल राशिद म्हणाले.
आयपीएलमध्ये चमकला
आयपीएल 2021 मध्ये वेगवान गोलंदाज टी नटराजनला कोरोनाची बाधा झाला होती. त्यानंतर उमरानला संधी देण्यात आली. उमरानने या संधीचं सोनं केलं. त्याने आपल्या वेगाच्या जोरावर सर्वांना हैराण करत शानदार कामगिरी केली. या दरम्यान उमरानने विराट कोहलीसह अन्य क्रिकेटपटूचं लक्ष वेधून घेतलं.
"कॉलेजमध्ये सराव करायचा"
"उमरानने क्रिकेटचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलंल नाही. तो कॉलेजमध्ये क्रिकेट अकादमीत जाऊन सराव करता करता शिकला आहे. अल्लाहने त्याला चांगली गोलंदाजी करण्याची ताकद दिली आहे", असं अब्दुल राशिद म्हणाले.
"उमरानमध्ये दम आहे. तो संपूर्ण दिवस क्रिकेट खेळायचा. तो सकाळी 10 वाजता घरुन निघायचा आणि संध्याकाळी 7 वाजता परतायचा. उमरान सरावासाठी जाताना सोबत 3-4 पाण्याच्या बाटल्या घेऊन जायचा. बाबा मला सरावासाठी जायचंय असं तो म्हणायचा", असं म्हणत अब्दुल राशिद यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
उमरानचे वडील फळविक्रेता
उमरान हा जम्मूतील गुज्जर नगर येथील एका सर्वसाधारण कुटुंबातून येतो. उमरानचे वडील फळविक्रेता आहेत. आमचं कुटंब नेहमीच उमरानला क्रिकेटसाठी प्रोत्साहित करत असतो. उमरानला वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षापासून क्रिकेटची आवड आहे. आम्ही त्याला क्रिकेट खेळण्यापासून कधीच रोखलं नाही. त्याला जे जे हवं होतं, ते ते त्याला आम्ही पुरवलं", असंही अब्दुल राशिद यांनी सांगितलं.
"मुलगा देशाचं नाव उज्वल करेल"
उमरानने आयपीएलमध्ये केलेल्या कारनाम्यानंतर त्यांचं कौतुक केलं जात आहे. जम्मूसह संपूर्ण देशातील जनता आनंदी आहे. "आमचा मुलगा चांगला खेळो आणि देशाचं उज्वल व्हावं, यासाठी प्रार्थना करा", असं अब्दुल राशिद म्हणाले.
I want to congratulate the people of Jammu & Kashmir and the country on selection of Umran Malik in the India A squad for South Africa tour. I wish he plays well and make the country proud: Malik's father Abdul Rashid in Jammu (10.11.2021) pic.twitter.com/m3u2ml4A8m
— ANI (@ANI) November 10, 2021