FIFA World Cup: रविवारी फिफा वर्ल्ड (FIFA World Cup 2022) कपमध्ये एक मोठा डाव पाहायला मिळाला. ज्यामध्ये फुटबॉल क्षेत्रातील आघाडीच्या खेळाडूंनी परिपूर्ण असणाऱ्या बेल्जियम (Belgium) संघाचा मोरोक्कोनं (Morocco) धुव्वा उडवला. मोरोक्कोच्या संघाकडून पहिला गोल रुमान साईस आणि दुसरा गोल ज़कारिया अबूखलाल यांनी केला. या विजयानंतर जिथं मोरोक्कोच्या संघाला Final 16 च्या शर्यतीत दुसरं स्थान मिळालं, तिथेच या शर्यतीत बेल्जियमच्या संघाची वाटचाल आता अपेक्षेपेक्षा जास्त कठीण असणार आहे. (FIFA World Cup 2022 Riots in Belgium after defeat from qatar)
बेल्जियमच्या संघाचा कतारमध्ये (Qtar) पराभव झाला. पण, त्याचे परिणाम थेट या देशाच्या राजधानीमध्ये म्हणजेच brussels मध्ये पाहायला मिळाले. कारण, इथल्या गल्लीबोळात दंगलीसदृश हिंसा झाल्याचं आढळलं. नागरिकांमध्ये भडकलेल्या या हिंसेला पाहता स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी बहुतांश भाग सील करत वॉटर कॅननही तैनात केल्याचं पाहायला मिळालं.
पोलिसांकडून काही आंदोलनकर्त्यांवर अटकेची कारवाईसुद्धा करण्यात आली. पण, नेमकं कितीजणांना ताब्यात घेतलं गेलं याचा आकडा मात्र जाहीर करण्यात आलेला नाही. ही गोंधळ इतका वाढला होता, की मेट्रो स्थानकंही बंद करण्यात आली.
रॉयटर्सच्या वृत्ततानुसार शेजारी राष्ट्र नेदरलँड्समध्ये असणाऱ्या रॉटरडॅम शहरातही अशाच प्रकारची हिंसा घडली होती. इथं अधिकाऱ्यांनी 500 फुटबॉल समर्थकांच्या समुहाला पांगवण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनुसार या समुहानं पोलिसांवरच फटाके आणि काचांचा मारा करण्याचा प्रयत्न केला होता.
तब्बल 24 वर्षांनंतर मोरोक्कोच्या (Morocco Win) संघानं फिफा वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. मोरोक्कोच्या संघाचा हा FIFA मधील आताचपर्यंतचा तिसरा विजय आहे. अखेरचं सांगावं तर, 1998 मध्ये हा संघ स्कॉटलंडविरोधातील सामना जिंकला होता. त्यातही बेल्जियमसारख्या बलाढ्य संघाला नमवल्यामुळं मोरोक्को भलत्यात आनंदात आहे असं म्हणायला हरकत नाही.